पकोडे आंदोलनापूर्वीच निरुपम यांना अटक

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

मुंबई - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या भजी विकण्याच्या विधानाला विरोध करण्यासाठी मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या नेतृत्वाखाली आज अनेक पदवीधर बेरोजगार तरुण मंत्रालयासमोर भजी (पकोडे) विकून अमित शहा यांचा निषेध करणार होते. तत्पूर्वी संजय निरुपम आणि आंदोलनकर्त्या तरुणांना पोलिसांनी मंत्रालयाकडे जात असताना अटक केली.

या वेळी संजय निरुपम म्हणाले की, भाजप सरकार सुशिक्षित तरुणांना नोकऱ्या देण्यास असमर्थ आहे. बेरोजगारांनी बेरोजगार राहण्यापेक्षा भजी (पकोडे) विकावी, असा सल्ला देऊन त्यांचा अपमान करत आहे, सध्या देशात 12 करोड बेरोजगार असून, त्यांना रोजगार मिळवून देण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे. अमित शहा यांनी राज्यसभेतील भाषणात अपमानजनक विधान करून या बेरोजगार तरुणांच्या शिक्षणाचा अपमान केला आहे. त्याचा निषेध म्हणून आम्ही या पदवीधर बेरोजगार तरुणांसोबत मंत्रालयासमोर भजी (पकोडे) विकून विरोध प्रकट करण्यास जात असताना गिरगाव चौपाटीजवळ पोलिसांनी अडवले. मंत्रालयासमोर अटक केली असती तर समजू शकलो असतो; पण आंदोलनापूर्वीच अटक करून सरकार त्या तरुणांचा आवाज दाबू पाहत आहे, असा आरोप निरुपम यांनी केला.

Web Title: mumbai news maharashtra news pakode agitation sanjay nirupan arrest