मतदारांनो, अंतरात्म्याचा आवाज ऐका - मीरा कुमार 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 1 जुलै 2017

मुंबई -  राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत माझी उमेदवारी ही विचारांच्या लढाईसाठी आहे. एक इतिहास घडवण्याची संधी मतदार लोकप्रतिनिधींना आहे. त्यामुळे, प्रत्येक मतदाराने आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकून मतदान करावे. देशातली सहिष्णुता, एकात्मता व बलवान भारतासाठी मतदान करावे, असे आवाहन राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार मीरा कुमार यांनी आज येथे केले. 

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार, आमदारांना मतदानाचे आवाहन करण्यासाठी मीरा कुमार आज मुंबईत आल्या होत्या. या वेळी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आपली भूमिका मांडली. 

मीरा कुमार म्हणाल्या, विरोधी पक्षांची एकता समान विचारधारेवर आधारित आहे. लोकतांत्रिक मूल्ये, सामाजिक न्याय, सर्व समावेशक समाजाची निर्मिती, माध्यमांचे स्वातंत्र्य, पारदर्शकता, गरिबीचे उच्चाटन, जाती व्यवस्थेचा अंत ही मूल्ये या विचारधारेची अविभाज्य घटक आहेत. त्यावर माझी आस्था आहे. त्यामुळे ही निवडणूक मी याच विचारधारेवर लढत आहे. चार दिवसांपूर्वीच मी निवड मंडळांच्या सन्माननीय सदस्यांना पत्र लिहून मला पाठिंबा देण्याची विनंती केली आहे. त्यांना इतिहास घडवण्याची ही अद्वितीय संधी आहे. अशा वेळी त्यांनी आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकण्याची आवश्‍यकता आहे. 

जातीची चर्चा दुर्दैवी 
यापूर्वी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत अनेक वेळा तथाकथित उच्च जातीचे उमेदवार समोरा-समोर उभे होते. तेव्हा त्यांच्या जातीची चर्चा झाली नाही, तर त्यांचे गुण, क्षमता आणि योग्यता याची चर्चा झाली. मात्र, आज या निवडणुकीला दोन दलित उभे आहेत. माझ्यासमोर सन्माननीय कोविंदजी उमेदवार आहेत, तर आता दोन दलित उमेदवार असल्याची चर्चा सुरू आहे. व्यक्तित्वाची चर्चा नाही, असे मीरा कुमार म्हणाल्या. 2017 मध्ये समाज अशा पद्धतीने विचार करतो, हे दुर्दैवी असल्याची खंतही त्यांनी व्यक्‍त केली.

Web Title: mumbai news Meera Kumar Presidential Elections