म्हाडाची शुक्रवारी सोडत 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

मुंबई - सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडाच्या सोडतीसाठी हजारो इच्छुकांनी अर्ज केले आहेत. त्याची सोडत शुक्रवारी (ता. 10) काढण्यात येणार आहे. यामधील आजी-माजी खासदार, म्हाडा कर्मचारी, माजी सैनिक, पत्रकार यांच्यासाठी राखीव असलेल्या घरांना कमी प्रतिसाद मिळाल्याने अनेक अर्जदारांचे सोडतीपूर्वीच हक्‍काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. तर आजी-माजी आमदारांच्या 16 घरांसाठी एकही अर्ज दाखल नाही. 

वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात सकाळी 10 वाजता संगणकीय सोडत काढण्यात येणार आहे. त्याची जय्यत तयारी म्हाडाने सुरू केली आहे. नागरिकांना घरबसल्या सोडत पाहता यावी, यासाठी प्रशासनाने सोडतीचे फेसबूक लाईव्ह करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा आज निर्णय झाला असून, याची प्राथमिक चाचणी बुधवारी घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. 

सोडतीसाठी 65 हजार 125 अर्जदारांचे अर्ज आले आहेत. काही संकेत क्रमांकाच्या घरांना कमी प्रतिसाद लाभल्याने अनेक जण सोडतीपूर्वीच विजयी ठरले आहेत. विक्रोळी कन्नमवार येथील आजी-माजी लोकप्रतिनिधींसाठी राखीव असलेल्या तीन घरांसाठी दोन अर्ज आल्याने दोन्ही अर्जदार यशस्वी ठरले आहेत. तर गोरेगाव येथील लोकप्रतिनिधींच्या दोन घरांसाठी एकच अर्ज आल्याने शरद पाटील हे विजेते ठरले आहेत. 

चारकोप कांदिवली येथील लोकप्रतिनिधींच्या एका घरासाठी एकच अर्ज आला आहे. तर म्हाडा कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या पवई तुंगा येथील तीन घरांसाठी एकच अर्ज आल्याने कर्मचारी दर्शना कोळी विजेत्या ठरल्या आहेत. पवई तुंगा येथील उच्च उत्पन्न गटात पत्रकारांसाठी राखीव असलेल्या चार घरांसाठी चारच अर्ज आल्याने संबंधित अर्जदार विजेयी ठरले आहेत. 

"त्या' घरांसाठी सोडत नाही 
कन्नमवारनगर, गोरेगाव येथील लोकप्रतिनिधींसाठी राखीव असलेल्या 16 घरांसाठी एकही अर्ज आलेला नाही. त्यामुळे या घरांची सोडत काढण्यात येणार नाही. 

Web Title: mumbai news mhada