गुजराती पाट्यांचे मनसे कार्यकर्त्यांकडून 'खळ्ळ खट्याक'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

राज ठाकरे यांनी रविवारी रात्री शिवतीर्थावर सभा झाली. यावेळी राज यांनी बुलेट ट्रेन महाराष्ट्रावरील थोपविण्यात येत असल्याचे सांगितले. गुजराती नागरिकांनी अनेक बाज काबीज केल्याचेही त्यांनी सांगितले. परराज्यातून येणाऱ्या नागरिकांना नोकऱ्या आणि घरे मिळत आहेत आणि मराठी माणूस बेघर होत असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदीवर जोरदार टीका केल्यानंतर पालघरमधील मनसे कार्यकर्त्यांकडून मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील गुजराती पाट्यांचे खळ्ळ खट्याक करण्यात आले. 

राज ठाकरे यांनी रविवारी रात्री शिवतीर्थावर सभा झाली. यावेळी राज यांनी बुलेट ट्रेन महाराष्ट्रावरील थोपविण्यात येत असल्याचे सांगितले. गुजराती नागरिकांनी अनेक बाज काबीज केल्याचेही त्यांनी सांगितले. परराज्यातून येणाऱ्या नागरिकांना नोकऱ्या आणि घरे मिळत आहेत आणि मराठी माणूस बेघर होत असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. 

या सभेनंतर घरी परतताना पालघरमधील मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील गुजराती फलक लावलेल्या हॉटेलच्या पाट्यांची तोडफोड केली. यामुळे पुन्हा एकदा मनसे मराठी मुद्द्यावर आक्रमक झाल्याचे दिसून आले.

Web Title: Mumbai news MNS workers attack gujrati boards Raj Thackeray speech