मॉन्सून 8 जूनला मुंबईत: हवामान विभाग

वृत्तसंस्था
बुधवार, 31 मे 2017

मॉन्सूनच्या प्रगतीस अनुकुल स्थिती असल्यामुळे मॉन्सून प्रगती जोरदार होत आहे. अंदमानमध्ये लवकर पोहचलेला मॉन्सून दोन दिवस आधीच केरळच्या किनारपट्टीवर पोहचला.

मुंबई - केरळच्या किनारपट्टीवर दोन दिवस आगोदरच दाखल झालेला मॉन्सून मुंबईत आठ जूनला दाखल होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून (आयएमडी) सांगण्यात आले आहे.

मॉन्सूनच्या प्रगतीस अनुकुल स्थिती असल्यामुळे मॉन्सून प्रगती जोरदार होत आहे. अंदमानमध्ये लवकर पोहचलेला मॉन्सून दोन दिवस आधीच केरळच्या किनारपट्टीवर पोहचला. आता त्याचा पुढील प्रवासही लवकर होण्याची शक्यता आहे. कर्नाटक आणि कोकणच्या किनारपट्टीवर लवकरच तो दाखल होण्याची शक्यता आहे.

गेल्यावर्षी मुंबईत मॉन्सून 12 जूनला दाखल होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, तो 20 जूनला दाखल झाला होता. यंदा 8 ते 10 जून दरम्यान तो पूर्ण महाराष्ट्र व्यापेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. येत्या तीन-चार दिवसांत मॉन्सून कर्नाटक आणि तमिळनाडूची पूर्ण किनारपट्टी व्यापेल, असेही सांगण्यात आले आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये आज (बुधवार) सकाळी मॉन्सूनपूर्व सरी कोसळल्या. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार पहायला मिळाली. तर, कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातही पावसाच्या सरी कोसळल्या.

ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :
बीफ फेस्टिव्हलवरून विद्यार्थ्याला मारहाण​
मुख्यमंत्र्यांचा शेट्टी, जयंतरावांवर नेम; सदाभाऊंची ढाल​
दिल्ली आयआयटीतील विद्यार्थीनीची आत्महत्या

जनावरे विक्री बंदीबाबत दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सूट शक्‍य
शेतकरी संपावर काहीही साध्य होणार नाही : माधव भंडारी
दीड पायाच्या ‘लक्ष्मी’ची झेप
#स्पर्धापरीक्षा - बलुचिस्तान
शहरांच्या जागतिक क्रमवारीत पुणे तेरावे

Web Title: mumbai news Monsoon to hit Mumbai around June 8-10: IMD