मुंबई विद्यापीठातील दोघांवर ऍट्रॉसिटी गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 सप्टेंबर 2017

मुंबई - निकालातील अक्षम्य दिरंगाई ताजी असतानाच आता मुंबई विद्यापीठातील आणखी एक वाद चव्हाट्यावर आला आहे. बीकेसी पोलिसांनी विद्यापीठाच्या संज्ञापन व पत्रकारिता विभागाचे प्रमुख डॉ. संजय रानडे आणि सहायक प्राध्यापिका डॉ. दैवता पाटील यांच्याविरोधात दलित अत्याचार प्रतिबंधक (ऍट्रॉसिटी) कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. 

या विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. सुंदर राजदीप यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली. पाटील व रानडे या दोघांनीही अपमानास्पद शब्दांत बोलून मारहाण करण्याची धमकी दिली, असे राजदीप यांनी तक्रारीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक कल्पना गाडेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गुन्हा नोंदविला असल्याचे सांगितले. 

विद्यापीठाच्या कालिना संकुलातील आरोग्य केंद्र इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील सहायक प्राध्यापकांच्या "स्टाफ रूम'मध्ये हा प्रकार घडला. राजदीप यांनी पाठविलेल्या मेलवर तीव्र आक्षेप घेत पाटील यांनी मंगळवारी (ता. 19) दुपारी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरवात केली. त्यानंतर रानडे यांनीही अपमान केल्याचे, तसेच मारहाण करण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. संजय रानडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.

Web Title: mumbai news mumbai news Atrocity offense