महापालिकांनो हॉटेलांमधील धुम्रपान थांबवा...

no smoking
no smoking

मुंबई: महापालिका, नगरपालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांना आता आपल्या कार्यक्षेत्रातील हॉटेलांमध्ये ध्रुम्रपान रोखण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. ज्या हॉटेलांमध्ये बेकायदा धुम्रपान होत असेल तर त्यांचे परवाने रद्द केले जाऊ शकतात. तशा आशयाचे आदेश जारी करण्याबाबत नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी या खात्याच्या प्रधान सचिवमनिषा म्हैसकर यांना लेखी सुचना केली आहे.

तंबाखू, सिगारेट, गुटखा असे कोणतेही धुम्रपान करण्यासाठी हॉटेलांमध्ये "स्पेशल झोन" तयार करावे लागतात. त्यासाठी स्पेशल झोनची महापालिकेकडून परवानगी घ्यावी लागते. पण परवानगी न घेताच धुम्रपान केल्याचा प्रकार मुंबईतील पाच हॉटेलांमध्ये आढळून आला होता. त्यानंतर महापालिकेने या हॉटेलांवर कारवाई केली होती. त्याबाबतचे वृत्त "सकाळ"ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेत राज्यमंत्री पाटील यांनी आदेश जारी केले आहेत.

मुंबई महापालिकेने हॉटेलांवर केलेल्या कारवाईच्या धर्तीवर राज्यातील सर्वच महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अंमलबजावणी करावी, अशीलेखी सुचना पाटील यांनी केली आहे.

कोपर्डी बलात्कार व खून खटल्यासंबंधीची बित्तमबातमी वाचा...

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com