राणेंच्या प्रवेशाला अद्याप हिरवा झेंडा नाहीच 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

मुंबई - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कॉंग्रेसला निरोप देत भाजपत प्रवेश करण्याची तयारी कित्येक दिवसांपासून दाखवली असली, तरी अद्याप भारतीय जनता पक्षाने त्यांच्याबद्दल कोणताही निर्णय घेतला नसल्याचे विश्‍वसनीयरीत्या समजते. राणे यांचा पक्षाला कितपत उपयोग होईल, त्यांच्या दोन्ही मुलांना पक्षात सामावून घेणे शक्‍य होईल काय, याबद्दल भाजपच्या केंद्रीय नेतृत्व कोणत्याही सकारात्मक निष्कर्षावर पोचलेले नाही. त्यामुळेच नारायण राणे यांनी स्वतंत्र पक्ष काढण्याची तयारी दाखवल्याचे समजते. शिवसेनेची राजी-नाराजी आणि राणेंचा प्रवेश हे दोन वेगळे मुद्दे आहेत, असेही भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने नमूद केले. 

Web Title: mumbai news narayan rane