शेतीक्षेत्र, रोजगार आणि लघुउदयोगांकडे लक्ष दया; संघाच्या सूचना

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जानेवारी 2018

मुंबई: शेतीमालाला भाव, शेतीवर होणारे दुर्लक्ष, शेतमजुरांची होरपळ हे अत्यंत गंभीर झालेले विषय आहेत. लघुउदयोग रोजगारनिर्मितीचे सर्वात मोठे साधन आहेत. येत्या वर्षात या क्षेत्राचा विकास होणे भारतासाठी आवश्‍यक आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोदी सरकारला कळवले आहे. उदया (गुरुवार) सादर होणारा अर्थसंकल्प हा निवडणुकीपूर्वीचा अंमलबजावणीच्या दृष्टीने शेवटचा अर्थसंकल्प असेल. त्यामुळे जनसामान्यांच्या आयुष्यावर खऱ्या अर्थाने प्रभाव टाकणाऱ्या योजना या अर्थसंकल्पातून समोर याव्यात, अशी अपेक्षा व्यक्‍त करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघघने कोणत्याही प्रकारे जाहीरपणे सूचना केलेल्या नाहीत. संघाने संघाचे काम करावे आणि सरकारला त्यांचे काम करू दयावे, असे गेल्या चार वर्षातले धोरण आहे. मात्र, आगामी अर्थसंकल्प अत्यंत महत्वाचा आहे. मोदी सरकार पुन्हा सत्तेत येवू शकेल याचा ठोकताळा या अर्थसंकल्पातील तरतुदींमुळे बांधता येईल असे मानले जाते आहे. अर्थसंकल्पापूर्वी समाजातील सर्व महत्वाच्या घटकांकडून अपेक्षा किंवा सूचना मागवल्या जातात. संघानेही याच मालिकेअंतर्गत या अपेक्षा व्यक्‍त केल्या आहेत. संघपरिवारातील काही संघटनांनी मोदीसरकारविरोधात आंदोलने सुरू केली असली तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र अदयाप कोणतेही वक्‍तव्य न करता दूर रहाणे पसंत केले होते. परिवारातील सर्व संघटना निवडणुकीच्या काळात भाजपचा आपापल्या परीने प्रचार आणि प्रसार करतात. त्यासंदर्भात कोणताही आदेश जारी केला जात नसला तरी ही परिपाठी आता सर्वज्ञात आहे. मोदी यांनी काही निर्णयांबाबत दाखवलेली धडाडी हा परिवारातील बहुतेक जणांच्या आदराचा विषय आहे. निश्‍चलीकरणाच्या निर्णयाचेही संघ परिवाराने कधी मूकपणे तर कधी खुलेपणाने कौतुक केले होते. मात्र, या सरकारच्या वाटचालीत शेतीच्या प्रश्‍नांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असून त्याबाबत काही सुधारणा न झाल्यास त्याची मोठी किंमत मोजावी लागेल अशी भीती संघवर्तुळाला आहे असे समजते.

शेतीचा प्रश्‍न बिकट झाला असल्याची कबुली भाजपनेते खाजगीत देत असतात. युवकांना दाखवलेले अच्छे दिनचे स्वप्न रोजगारनिर्मितीच्या वाटेने जाते. त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यासंदर्भात सूचना केल्या असाव्यात असे मानले जाते. त्या पूर्ण होतील काय ते उदयाच्या अर्थसंकल्पातुन स्पष्ट होईल. संघाच्या एका पदाधिकाऱ्याने सूचना करणे हे आमचे काम असून, त्याबददलचा निर्णय सरकार घेईल असेही स्पष्ट केले.

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या :
भाजपा म्हणते, राहुल गांधींचे जॅकेट 70 हजारांचे
आई-बाबा सांगा ना, आमची काय चूक...​
मृत तरुणी परत आल्याच्या अफवेने गोंधळ​
"हे राम' म्हटल्याबद्दलच्या विधानाचा विपर्यास​
सरकारी कर्मचाऱ्यांना रविवारी रजा नको; न्यायालयाची सूचना​
विकासवृद्धीसाठी झेपावे निर्यातीकडे!​

श्रीमंत देशांत भारत सहावा; अमेरिका प्रथम
तनिष्कने केली 1045 धावांची नाबाद विश्‍वविक्रमी खेळी​
दोषींवर कडक कारवाई करू; आदित्यनाथ यांनी मौन सोडले​

Web Title: mumbai news narendra modi budjet 2018 agriculture and rss