नाइट ज्युनियर महाविद्यालये पुन्हा सुरु होणार  

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

मुंबई - रात्रशाळांतील दुबार शिक्षकांच्या प्रश्‍नांवरुन पेटलेल्या वादावर शिक्षण विभागाने एक पाऊल मागे टाकले आहे. विविध शिक्षक संघटना तसेच ज्युनियर महाविद्यालयीन संघटनांच्या आक्रमक भूमिकेमुळे शुक्रवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने नाईट ज्युनियर कॉलेजेसमधील दुबार शिक्षकांची सेवा तूर्तास चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. 

मुंबई - रात्रशाळांतील दुबार शिक्षकांच्या प्रश्‍नांवरुन पेटलेल्या वादावर शिक्षण विभागाने एक पाऊल मागे टाकले आहे. विविध शिक्षक संघटना तसेच ज्युनियर महाविद्यालयीन संघटनांच्या आक्रमक भूमिकेमुळे शुक्रवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाने नाईट ज्युनियर कॉलेजेसमधील दुबार शिक्षकांची सेवा तूर्तास चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. 

या निर्णयाचे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ, शिक्षक भारती संघटनेने स्वागत केले आहे. रात्रशाळा शिक्षकांचा पहिला विजय झाला या शब्दांत शिक्षक भारती संघटनेने आनंद व्यक्त केला. नाईट ज्युनियर महाविद्यालयातील 139 पदांपैकी 115 पदे दुबार शिक्षकांची होती. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून नाईट ज्युनियर कॉलेजेस बंद पडली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघ चांगलीच संतापली होती. याबाबत शुक्रवारी दुपारी सह्याद्री अतिथी गृह येथे महासंघ व शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची बैठक पार पडली. या बैठकीत महासंघाने सद्यस्थितीत ज्युनियर महाविद्यालये बंद असल्याची कल्पना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना दिली. महासंघाशी झालेल्या चर्चेनंतर यावर सकारात्मक उपाय त्वरित काढला जाईल, असे आश्‍वासन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले. या बैठकीनंतर शिक्षण उपसंचालक कार्यालयातून परिपत्रक जाहीर केले गेले. 

ब-याच उच्च माध्यमिक रात्रशाळेत शिक्षकांअभावी शिकवणीचे काम बंद असल्याचे विविध संघटनांनी तसेच शाळा व्यवस्थापनांनी शिक्षणमंत्र्यांना बाब लक्षात आणून दिली. त्यामुळे रात्र कनिष्ठ महाविद्यालयामध्ये दुबार शिक्षकांची सेवा तूर्तास पुढे चालू ठेवावी, असे आदेश परिपत्रकातून शिक्षण उपसंचालक बी.बी. चव्हाण यांनी दिले. 

आता उर्वरित 176 माध्यमिक रात्रशाळांचा जीआरही सरकारने मागे घ्यावा, अशी मागणी शिक्षक भारतीचे प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी केली. उरलेल्या रात्रशाळाही सुरु कराव्या लागतील, असा विश्‍वास आमदार कपिल पाटील यांनी व्यक्त केला. 

Web Title: mumbai news Night junior colleges education