अकरावी ऑनलाईन अर्जासाठी मुदतवाढ 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

मुंबई - अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी नावनोंदणी आणि प्रवेश अर्ज भरण्यासाठी दोन दिवसांची मुदत वाढवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना 29 जूनच्या सायंकाळी पाचपर्यंत अर्ज करता येईल. मुंबई, अमरावती व अन्य विभागांत सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशासंदर्भात गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मुदतीनंतर ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज भरता येणार नाही, असे शिक्षण उपसंचालकांनी पत्रकात म्हटले आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी (ता. 27) सायंकाळी पाचपर्यंत होती. मुदतवाढीमुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 

Web Title: mumbai news online admission