मंत्रालयात सोमवारी ऑनलाइन लोकशाही दिनाचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. 12) सकाळी 11.30 वाजता मंत्रालयातील मुख्यमंत्री समिती कक्षात ऑनलाइन लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. 12) सकाळी 11.30 वाजता मंत्रालयातील मुख्यमंत्री समिती कक्षात ऑनलाइन लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

मंत्रालय लोकशाहीदिनी ज्या अर्जदारांनी अर्जाच्या विहित प्रपत्राच्या नमुन्यानुसार अर्जाची आगाऊ प्रत व त्यासह आवश्‍यक कागदपत्रांच्या प्रती जोडल्या असतील आणि ज्यांना अर्ज स्वीकृतीबाबत सामान्य प्रशासन विभागामार्फत कळविण्यात आले आहे, अशा मुंबई शहर व उपनगर जिल्ह्यातील अर्जदारांना लोकशाहीदिनी मुख्यमंत्री यांच्या समक्ष निवेदन मांडता येणार आहे.

मुंबई व उपनगर जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांतील संबंधित अर्जदारांनी त्यांची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे मांडण्यासाठी आपापल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील दालनात सकाळी 11.15 वाजता प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे कळविण्यात आले आहे.

Web Title: mumbai news online democracy day in mantralaya