संविधान बचाव रॅलीत प्रकाश आंबेडकर नाहीत

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 17 जानेवारी 2018

मुंबई - 'मंत्रालय ते गेट वे ऑफ इंडिया या परिसरात राजू शेट्टी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या संविधान बचाव रॅलीत रिपब्लिकन नेते प्रकाश आंबेडकर सहभागी होणार नाहीत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जनता दलाचे शरद यादव, जिग्नेश मेवाणी आदी नेते सहभागी होणार आहेत; मात्र भारिप बहुजन महासंघाला यासंबंधात संपूर्णत: अंधारात ठेवले गेल्याची माहिती एका सूत्राने दिली.

दरम्यान, या आयोजनापाठोपाठ कॉंग्रेसने जिल्ह्याजिल्ह्यांत संविधान बचाव रॅलीचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. आज टिळक भवनात झालेल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी यासंदर्भात चर्चा केली.

Web Title: mumbai news prakash ambedkar not involve in constitution save rally