गर्भवतींना मिळणार सहा हजार रुपये 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

मुंबई - गर्भवतींना सहा हजार रुपये अर्थसाह्य देण्यात येणार आहे. देशभर या निर्णयाची अंमलबजावणी 1 जानेवारीपासून सुरू झाली आहे. 

गरोदरपणाच्या काळात महिलांचा रोजगार बुडतो. या काळात पैशांअभावी त्यांना आवश्‍यक आहार घेता येत नाही. गर्भवती कुपोषित असेल तर कुपोषित मूल जन्माला येते. म्हणूनच मॅटर्निटी बेनिफिट प्रोग्राम (एमबीपी) देशभर राबवण्यात येत आहे. गर्भवतींना सहा हजार रुपये पोस्टातील त्यांच्या बचत खात्यात जमा करण्यात येणार आहेत. तीन टप्प्यांत ही रक्कम त्यांना देण्यात येईल. 

गरोदरपणाच्या काळात बुडणाऱ्या रोजगाराचा मोबदला म्हणून ही रक्कम देण्यात येईल. गरोदरपणाच्या काळात त्यांनी आराम करावा, आरोग्य जपावे आणि पोषण आहार घ्यावा हा या योजनेचा उद्देश आहे. प्रसूतीनंतर पहिल्या सहा महिन्यांत बाळाच्या पोषणासाठी ही योजना फायदेशीर ठरेल. प्रसूतीपूर्व तीन हजार रुपये आणि प्रसूतीनंतर दोन टप्प्यांत 1500 रुपये गर्भवतीच्या खात्यावर जमा करण्यात येतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलेला आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या आधारे नजीकच्या टपाल कार्यालयात खाते उघडावे लागेल. 

राज्य सरकारच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या वतीने ही रक्कम गर्भवतींच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. या योजनेचा अर्थभार राज्य सरकार आणि केंद्र सरकार संयुक्तपणे उचलणार आहेत. या योजनेसाठी केंद्र सरकार 60 टक्के, तर राज्य सरकार 40 टक्के रकमेचा भार उचलेल. या योजनेचा देशभरातील 51 लाख 70 हजार महिलांना फायदा होईल, असा अंदाज आहे.

Web Title: mumbai news pregnant women will get six thousand rupees