खासगी डॉक्‍टरांचा आज ‘काळा दिवस’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

मुंबई - संसदेत सादर झालेल्या नॅशनल मेडिकल कमिशन बिल २०१७ च्या विरोधात देशभरातील डॉक्‍टर मंगळवारी (ता. २) काळा दिवस पाळणार आहेत. परिणामी, खासगी वैद्यकीय सेवा विस्कळित होण्याची शक्‍यता आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रतिनिधी असलेली खासगी रुग्णालये आणि दवाखान्यांमधील बाह्य रुग्ण विभाग सकाळी १० ते रात्री १० या वेळेत बंद राहणार आहेत. रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून आपत्कालीन विभाग आणि अत्यावश्‍यक सेवा सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. यशवंत देशपांडे यांनी दिली.

मुंबई - संसदेत सादर झालेल्या नॅशनल मेडिकल कमिशन बिल २०१७ च्या विरोधात देशभरातील डॉक्‍टर मंगळवारी (ता. २) काळा दिवस पाळणार आहेत. परिणामी, खासगी वैद्यकीय सेवा विस्कळित होण्याची शक्‍यता आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रतिनिधी असलेली खासगी रुग्णालये आणि दवाखान्यांमधील बाह्य रुग्ण विभाग सकाळी १० ते रात्री १० या वेळेत बंद राहणार आहेत. रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून आपत्कालीन विभाग आणि अत्यावश्‍यक सेवा सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. यशवंत देशपांडे यांनी दिली. इंडियन मेडिकल काउन्सिलच्या आंदोलनामुळे खासगी दवाखाने, रक्ततपासणी केंद्रे, एक्‍स रे आदींवरही परिणाम होण्याची शक्‍यता आहे. राज्यात  ४० हजार आणि मुंबईत २० हजार डॉक्‍टर यामध्ये सहभागी होणार आहेत.

Web Title: mumbai news private doctor black day