प्रत्येकाला बीफ खाण्याचा अधिकार: रामदास आठवले

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 15 जुलै 2017

मुंबईः 'प्रत्येकालाच बीफ खाण्याचा अधिकार आहे. अशा प्रकारे एखाद्याला मरेपर्यंत मारहाण करणाऱ्या गोरक्षकांना कठोर शिक्षा व्हायला हवी, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. गोरक्षणाच्या नावाखाली भक्षक होणे योग्य नाही, असेही ते म्हणाले.

गेल्या काही महिन्यांपासून देशभरात कथित गोरक्षकांकडून अनेकांना मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनांवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चिंता व्यक्त केली होती. असे प्रकार यापुढे सहन करणार नाही, असा इशाराही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला होता. मात्र, त्यानंतरही मारहाणीच्या घटना थांबल्या नाहीत. या घटनांवर आठवले यांनीही चिंता व्यक्त केली आहे. गोरक्षणाच्या नावाखाली हिंसा घडवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. "तुम्हाला पोलिसांकडे जाण्याचा अधिकार आहे. कायदा हातात घेण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला नाही,'' असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

ई सकाळवरील ताज्या बताम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: mumbai news ramdas athawale statement on beef