नारीशक्तीच्या यशोभरारीला ‘सकाळ’चा मानाचा मुजरा!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

नवी मुंबई - आपल्या नेतृत्वगुणांच्या जोरावर स्वतःबरोबरच समाजाचीही प्रगती साधत कर्तृत्वाचा झेंडा फडकवणाऱ्या महिलांच्या शिरपेचात शुक्रवारी (ता. ९) आणखी एक सन्मानतुरा खोवला गेला. ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत विविध क्षेत्रांतील स्त्रीशक्तीला ‘सकाळ-वुमन इम्पॅक्‍ट ॲवॉर्ड’ देऊन गौरवण्यात आले.

वाशीतील सिडको एक्‍झिबिशन सेंटरमध्ये विविध मान्यवर आणि मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील चमचमत्या ताऱ्यांच्या उपस्थितीत, नृत्य आणि गाण्यांच्या सुरेल मैफलीत ‘ती’च्या गौरवाचा नवा अध्याय लिहिला गेला. या वेळी महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करण्यासाठी मान्यवर आणि वाचकांनी गर्दी केली होती. 

सोहळ्याची सुरुवात अभिनेत्री तेजा देवकर हिने सादर केलेल्या गणेशवंदनेने झाली. त्यानंतर निवेदिका समिरा गुजर ‘सकाळ-वुमन इम्पॅक्‍ट ॲवॉर्ड’बाबत माहिती देत ‘सकाळ माध्यम समूहा’च्या संचालिका मृणाल पवार, आमदार मंदा म्हात्रे, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. एन. रामास्वामी, नवी मुंबईच्या उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, गायिका वैशाली सामंत, साई इस्टेट कन्सल्टन्सीच्या स्वाती वाधवानी, ‘ओरियन मॉल’चे मंगेश परुळेकर आणि मानसी परुळेकर, ‘इन्फ्राटेक’च्या संचालिका अलंक्रित राठोड या मान्यवरांना व्यासपीठावर आमंत्रित केले. त्यांनी केलेल्या दीपप्रज्वलनानंतर कार्यक्रमाला सुरवात झाली. मृणाल पवार यांनी या वेळी पुरस्कारामागील ‘सकाळ’ची भूमिका स्पष्ट केली. 

उपस्थित सर्व मान्यवर आणि गौरवण्यात आलेल्या महिलांनी ‘सकाळ’च्या अनोख्या उपक्रमाचे आवर्जून कौतुक केले. तसेच असा नावीन्यपूर्ण सोहळा आयोजित केल्याबद्दल ‘सकाळ’चे आभार मानून या उपक्रमाला आपला पाठिंबाही दर्शवला. 
उपस्थित मान्यवर

नवी मुंबई महापालिका सभागृह नेते रवींद्र इथापे, स्थायी समिती सभापती शुभांगी पाटील, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, नगरसेविका शशिकला पाटील, ओरायन मॉलचे संस्थापक-अध्यक्ष मंगेश परुळेकर.

Web Title: Mumbai News Sakal Women Impact award