साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचा जामीन अर्ज फेटाळला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

मुंबई: खासदार उदयनराजे भोसले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने आज (बुधवार) फेटाळला. खासदार भोसले यांच्यावर लोणंद औद्योगिक वसाहतीमधील सोना अलॉईज कंपनीचे व्यवस्थापक राजकुमार जैन यांना खंडणी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल होता. सातारा जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्याने त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

खासदार भोसले यांच्या विरोधात 22 मार्चला सातारा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. त्यानंतर त्याचा ९ साथीदारांना पोलिसांनी अटक करून सातारा जिल्हा न्यायालायात हजर केले होते. या सर्वांना न्यायालयाने पोलिस कोठडी दिली. मात्र, उदयनराजे यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज सातारा जिल्हा न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकत होती. मात्र, गेली २ महिने ही अटक होत नव्हती. दरम्यान, उदयनराजे सध्या साताऱ्यात देखील नाहीत अशी माहिती आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: mumbai news satara mla udayanraje bhosale court the bail application is rejected