पवार यांच्या बदनामीबाबत युवकाच्या विरोधात तक्रार

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याबद्दल फेसबुकवर वादग्रस्त वक्‍तव्य करणाऱ्या युवकाच्या विरोधात राज्यभरात विविध ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. ‘राष्ट्रवादी’चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबाबतची पहिली तक्रार सायबर सेलकडे केल्यानंतर संबधित फेसबुक पेजचे ॲडमिन व वादग्रस्त विधान करणाऱ्या युवकाच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या. 

अवधूत प्रकाशराव शिंदे असे नाव असलेल्या युवकाने FadanvisforMahrashtra या फेसबुक पेजवर शरद पवार यांच्याबद्दल बदनामीकारक विधान केले होते. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. संबंधित फेसबुक पेज हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चाहत्यांचे असून, या पेजच्या ॲडमिनबाबतही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या सर्वांना पोलिस प्रशासनाने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी आव्हाड यांनी केली आहे.  

याबाबत अधिक माहिती देताना आव्हाड म्हणाले, की या फेसबुक पेजवरून सतत शरद पवार यांची बदनामी सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावाने हे फेसबुक चालवले जात असतानाही पोलिसांनी याबाबत दक्षता घेतलेली नाही. शरद पवार हे देशाचे नेते आहेत. केंद्र व राज्यात ते गेली ५० वर्षे अव्याहत विविध महत्त्वाच्या पदांवर राहिलेले आहेत. त्यांचाबद्दल आक्षेपार्ह विधान जर फेसबुकवरून केले जात असेल, तर अशा समाजकंटकांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करायला हवी.

Web Title: mumbai news sharad pawar social media