शिवसेनेविरोधातील सोमय्यांच्या तक्रारीचे भवितव्य एसीबीवर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

मुंबई - भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी सक्तवसुली संचालनालयाकडे (ईडी) केलेल्या तक्रारीचे भवितव्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कारवाईवर अवलंबून आहे. एसीबीने याप्रकरणी कोणतीही ठोस पावले उचलली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांना शिवसेनेने पैसे देऊन फितवल्याचा आरोप करत सोमय्यांनी या प्रकरणी एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानंतर त्यांनी ईडीकडेही तक्रार करून या प्रकरणात भ्रष्टाचार आणि मनी लॉंडरिंग झाल्याने चौकशी करावी, अशी मागणी केली आहे; परंतु चौकशी करण्यात तांत्रिक अडचणी आहेत. कारण कायद्यानुसार दुसऱ्या तपास यंत्रणेकडे गुन्हा दाखल असल्याशिवाय ईडी गुन्हा दाखल करू शकत नाही. त्यामुळे सोमय्यांच्या तक्रारीचे भवितव्य एसीबीच्या कारवाईवर अवलंबून आहे. 

सोमय्या यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या सहा नगरसेवकांना शिवसेनेने पाच कोटी रुपये दिल्याचा आरोप करत या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली होती.

Web Title: mumbai news shiv sena Kirit Somaiya ACB