शिवसेना सचिवपदी मिलिंद नार्वेकर 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

मुंबई - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांची पक्षाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

मुंबई - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांची पक्षाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

गेली कित्येक वर्षे शिवसेनेत उद्धव ठाकरेंसमवेत सावलीसारखे वावरणारे नार्वेकर त्यांच्या प्रभावामुळे बड्या नेत्यांच्या डोळ्यांत खुपत असत. मात्र आज त्यांची शिवसेनेच्या सचिवपदी वर्णी लागली. उद्धव ठाकरे, रश्‍मी ठाकरे तसेच आदित्य यांच्याशी जवळचे संबंध असलेल्या नार्वेकर यांचे सर्व पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध आहेत. विधान परिषदेवर प्रसाद लाड यांची निवड झाले तेव्हा नार्वेकर यांनी महत्वाची भूमिका बजावल्यामुळे शिवसेनेतील नेते त्यांच्यावर नाराज झाले होते. नार्वेकर यांची थेट सचिवपदी नियुक्‍ती झाल्याची घोषणा आज करण्यात आली. 

Web Title: mumbai news shiv sena milind narvekar