एसटी संपाचा तिढा कायम

प्रशांत बारसिंग
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

एसटी कर्मचारी संघटना आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची बुधवारी रात्री एक
वाजेपर्यंत बैठक सुरू होती. मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला
नाही. एसटी कर्मचार्यांच्या वेतनवाढीबाबत जास्तीत जास्त चांगला प्रस्ताव
आम्ही संघटनांसमोर सादर केला. पण एवढी मोठी वेतनवाढ मान्य करुनही
संघटनांचे समाधान होत नाही. आता यापेक्षा अधिक वेतनवाढ देणे एसटी महामंडळ
प्रशासनास शक्‍य नाही.

मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून एसटी कर्मचारी संघटना आणि
राज्यसरकारमध्ये सुरू असलेल्या चर्चेच्या बैठका निष्फळ ठरल्यामुळे आजही (गुरुवार)
एसटी संपाचा तिढा कायम असल्याचे चित्र आहे.

एसटी कर्मचारी संघटना आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची बुधवारी रात्री एक
वाजेपर्यंत बैठक सुरू होती. मात्र या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला
नाही. एसटी कर्मचार्यांच्या वेतनवाढीबाबत जास्तीत जास्त चांगला प्रस्ताव
आम्ही संघटनांसमोर सादर केला. पण एवढी मोठी वेतनवाढ मान्य करुनही
संघटनांचे समाधान होत नाही. आता यापेक्षा अधिक वेतनवाढ देणे एसटी महामंडळ
प्रशासनास शक्‍य नाही. संपूर्ण 77 वर्षातील तसेच संबंधीत संघटना स्थापन
झाल्यापासूनची ही सर्वाधिक मोठी वाढ आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचारी
संघटनांनी संप मागे घ्यावा. असे आवाहन दिवाकर रावते यांनी केले.

एसटी प्रशासनाने कर्मचार्यांसाठी साधारण 4 हजार ते 7 हजार रुपयांच्या
वेतनवाढीस होकार दिला. यासाठी साधारण 1100 कोटी रुपये खर्च होणार आहे.
मात्र कर्मचारी संघटनांनी एकूण 2 हजार कोटी ते बावीसशे कोटी रुपयांच्या
वेतनवाढीची मागणी केली आहे. त्यामुळे रात्रीची चर्चा फिस्कटल्याचे
सांगण्यात आले. कर्मचारी संघटनांनी मागणी केल्यानुसार आणखी हजार ते
अकराशे कोटी रूपयांची एसटी महामंडळ तजवीज करूच शकत नाही असे एसटी
प्रशासनाचे म्हणणे आहे.

Web Title: Mumbai news ST employee strike