आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना जीवन कौशल्य प्रशिक्षण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

मुंबई - आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या जीवन कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाचे (लाईफ स्कील ट्रेनिंग) उद्‌घाटन आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते सह्याद्री अतिथिगृहात सोमवारी (ता. 5) करण्यात आले. 

वयात येणाऱ्या मुला-मुलींना मार्गदर्शन करण्यासाठी या प्रशिक्षणाचा उपयोग होईल. आरोग्य विभाग, आदिवासी विकास आणि महिला बाल विकास विभागामार्फत कार्यक्रम 12 जूनपासून राज्यभर राबवण्यात येणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात 543 सरकारी आश्रमशाळांमधील तीन हजार 258 शिक्षक आणि अधीक्षकांना प्रशिक्षण देण्यात येईल. 

प्रशिक्षणाचा आराखडा राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य आणि पोषण मिशन व युनिसेफ यांनी तयार केला आहे. त्यात वाढत्या वयातील विद्यार्थी, पोषण-आरोग्य, निरोगी वर्तन आणि जीवन कौशल्य असा चार विभागांचा समावेश आहे. प्रशिक्षित शिक्षक आणि अधीक्षक दर आठवड्याला आश्रमशाळेत 6 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतील. 

आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, मुख्य सचिव सुमित मलिक, आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांच्यासह विविध खात्यांचे सचिव आणि अधिकारी उद्‌घाटनावेळी उपस्थित होते. 

प्रशिक्षणाचे स्वरूप 
प्रथम निवडक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येईल. ते शिक्षक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतील. 30 राज्यस्तरीय मास्टर ट्रेनरची निवड करण्यात येईल. त्यांना पाच दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येईल. मास्टर ट्रेनर प्रत्येक आश्रमशाळेतून आणि एकलव्य निवासी शाळेमधून निवडलेल्या सहा कर्मचाऱ्यांना तीन टप्प्यांत दोन दिवसांचे प्रशिक्षण देतील. यात दोन पुरुष आणि दोन महिला शिक्षकांसह पुरुष आणि स्त्री अधीक्षकेचा समावेश असेल.

Web Title: mumbai news student Ashram Shala