पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिक्षकांचे निवेदन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

मुंबई - अखिल भारतीय शैक्षणिक महासंघाशी संलग्न शिक्षक संघटना आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोमवारी (ता. 18) जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत निवेदने पाठविण्यात आली.

मुंबई - अखिल भारतीय शैक्षणिक महासंघाशी संलग्न शिक्षक संघटना आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोमवारी (ता. 18) जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत निवेदने पाठविण्यात आली.

मुंबईतील शिक्षकांच्या समस्या मांडण्यासाठी शिक्षक परिषदेने मुंबई उपनगर जिल्हा अधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांना निवेदन दिले. मुंबई शहरात जिल्हा अधिकारी संपदा मेहता यांना निवेदन देण्यात आले. अर्थसंकल्पातील शैक्षणिक तरतूद वाढवावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी, वैद्यकीय विमा योजना लागू करावी, हेल्थकार्ड सुरू करावे, मूल्याधारित शिक्षण द्यावे, मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य द्यावे, शिक्षणाचे बाजारीकरण थांबवावे आदी अठरा मागण्यांचे निवेदन शिक्षक परिषदेने जिल्हा अधिकाऱ्यांना दिले. 

Web Title: mumbai news teacher Prime Minister Narendra Modi