'विनोद तावडेंची हकालपट्टी करा'

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

मुंबई - मुंबई विद्यापीठाच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी उच्च शिक्षण खात्याची असल्याने या खात्याचे मंत्री विनोद तावडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी बुधवारी केली.

मलिक म्हणाले, की तावडे यांची मंत्रिपदावर राहण्याची क्षमता नाही. भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया गेले. त्यामुळे हकालपट्टी करण्यात आलेले कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्यावर जबाबदारी ढकलून पळवाट काढता येणार नाही. उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. तावडे यांना या पदावर राहण्याचा अधिकार नाही.

Web Title: mumbai news vinod tawade extortion