साक्षीदार फितूर कसे होतात - हायकोर्ट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

मुंबई - गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख चकमक खटल्यातील साक्षीदारांना सीबीआयने कशाप्रकारे संरक्षण दिले आहे, संरक्षण देऊनही ते फितूर का होतात, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केला.

मुंबई - गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख चकमक खटल्यातील साक्षीदारांना सीबीआयने कशाप्रकारे संरक्षण दिले आहे, संरक्षण देऊनही ते फितूर का होतात, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केला.

सोहराबुद्दीनची हत्या बनावट चकमकीत करण्यात आली, असा आरोप करणाऱ्या याचिकेवर सोमवारी (ता. 12) न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्यापुढे सुनावणी झाली. सीबीआयने साक्षीदारांना संरक्षण देऊनही ते फितूर होत असतील तर सीबीआय साक्षीदारांबाबत गंभीर नाही का, असा सवालही न्यायालयाने केला. सोहराबुद्दीनच्या भावाने न्यायालयात याचिका केली आहे. विशेष न्यायालयाने या खटल्यातील प्रमुख आरोपी असलेल्या गुजरातमधील दोन आणि राजस्थानमधील एका बड्या अधिकाऱ्याला दोषमुक्त केले आहे. मात्र, या निर्णयाविरोधात सीबीआयने अपील याचिका केलेली नाही. त्यामुळे सोहराबुद्दीनच्या भावाने याचिका केली असून, सीबीआयवर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे.

Web Title: mumbai news witness high court