तीन महिला पोलिसांना "बंद'वेळी धक्काबुक्की 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

मुंबई - कोरेगाव भीमा येथील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनावेळी आतापर्यंत 25 गुन्हे दाखल आहेत. यात 14 जणांवर विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पोलिसांना धक्काबुक्की आणि एका महिला पोलिसाचे केस पकडून ओढण्याचा प्रकार घडल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. 

चेंबूर नाका येथे जमावाकडून महिला पोलिसांना धक्काबुक्की झाली होती. त्यामुळे या प्रकरणी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2 जानेवारीला घडलेल्या या प्रकारात तीन महिला पोलिसांना धक्काबुक्की झाली. यातील एका महिला पोलिसाच्या डोक्‍यात मारण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणातील 14 आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. वाशी नाका परिसरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे चित्रीकरण मिळवून त्याद्वारे सध्या तपास सुरू आहे. याशिवाय, आरोपींचे मोबाईलवरील संभाषणही तपासले जात आहे. 

Web Title: mumbai news women police koregaon bhima