esakal | Mumbai: ऑनलाइन शिक्षणात खंड नको!
sakal

बोलून बातमी शोधा

ऑनलाइन शिक्षण

मुंबई : ऑनलाइन शिक्षणात खंड नको!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात सरकारने शाळा सुरू केल्यानंतरही कोरोनाची भीती तसेच इतर कारणांमुळे अनेक विद्यार्थी अद्याप शाळेत जाऊ शकलेले नाहीत. अशा पाल्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याची सूचना राज्य सरकारने केली होती; मात्र शाळा सुरू करण्याच्या शासन निर्णयात त्याबाबतचा उल्लेखच नसल्याने अनेक संस्थांचालकांनीही ऑनलाइन शिक्षण बंद केले. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसत असल्याने अखेर शिक्षण विभागाने शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेला (एससीईआरटी) ऑनलाइन शिक्षणासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

शालेय शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी ‘सकाळ’शी बोलताना ही माहिती दिली आहे. राज्यात शहरी भागात आठवी ते बारावी; तर ग्रामीण भागात पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे; मात्र शाळेत उपस्थित राहणे विद्यार्थ्यांना बंधनकारक नसून विविध कारणांमुळे उपस्थित राहू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण सुरूच राहील, असे सरकारतर्फे सांगण्यात आले होते; मात्र सरकारच्या निर्णयात विद्यार्थ्यांना शाळेसोबतच ऑनलाइन शिक्षण देण्याची तरतूद नसल्याने संस्थाचालकांकडून याचा गैरफायदा घेतला जात आहे.

हेही वाचा: मॉन्सूनची महाराष्ट्रातून माघार

विविध कारणांमुळे शाळेत उपस्थित राहू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम मागे राहू नये म्हणून लवकरच एससीईआरटीच्या नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या जाणार आहेत. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.

- विशाल सोळंकी, शालेय शिक्षण आयुक्त

loading image
go to top