संजय राऊतांना जामीन की कोठडी? आज होणार सुनावणी

Sanjay Raut
Sanjay RautSakal Digital

Sanjay Raut To Be Produced In Court Today : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीच्या अटक केलेल्या संजय राऊत यांची आज ईडीची कोठडी संपणार आहे. त्यामुळे त्यांना आज पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे. यावेळी राऊतांना जामीन मिळणार की कोठडी? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असून, ईडी आज पुन्हा एकदा संजय राऊतांची कोठडी वाढवून मिळावी, यासाठी मागणी करणार आहे.

Sanjay Raut
शिवसेना नेमकी ठाकरेंची की शिंदे गटाची? आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

यापूर्वीच्या राऊतांना अटक करण्यात आल्यानंतर ईडीने राऊतांना आठ दिवसांची कोठडी मिळावी अशी मागणी केली होती. मात्र, राऊतांच्या वकीलांनी केलेला युक्तीवादानंतर कोर्टाने ईडीची आठ दिवसांच्या कोठडीची मागणी अमान्य करत त्यांना आजपर्यंतची कोठडी सुनावली होती. त्याची मुदत आज संपणार असल्याने राऊतांना आज पुन्हा एकदा कोर्टात हजर केले जाणार असून, राऊतांची कोठडी वाढवून देण्याची मागणी ईडीकडून करण्यात येणार आहे. त्यावर कोर्ट राऊतांना बेल देणार की कोठडी वाढवून देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Sanjay Raut
सोशल प्रोफाइलवर तिरंगा का नाही? टीकेनंतर RSS ने दिलं स्पष्टीकरण

पत्राचाळ घोटाळा नेमका काय आहे?

गेल्या २००६ मध्ये जॉईंट व्हेंचरअंतर्गत गुरू आशिष बिल्डरने पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला. २००८ मध्ये या प्रकल्पाला सुरुवात झाली. पण, दहा वर्षानंतरही पुनर्विकास झाला नसल्याचे लक्षात आले. मूळ ६७८ रहिवाशांना वाऱ्यावर सोडून म्हाडाच्या घरांना देखील बिल्डरने चुना लावल्याची माहिती होती. या बिल्डरने म्हाडाला १ हजार ३४ कोटींचा चुना लावला होता. बिल्डरने विक्रीसाठी असलेले क्षेत्र सात त्रयस्थ विकाससकांना विकल्याचा आरोप या बिल्डरवर होता. ही गुरू आशिष कंस्ट्रक्शन कंपनीचे संचालक राकेश वाधवान आहे.

Sanjay Raut
भविष्यात फास्टॅगची गरज राहणार नाही; नितीन गडकरी

प्रविण राऊत यांच्या खात्यातून संजय राऊतांच्या पत्नीच्या खात्यात पैसे -

प्रविण राऊत हे संजय राऊतांचे स्नेही आहेत. त्यांच्या खात्यातून संजय राऊतांच्या पत्नीच्या खात्यात ५५ लाख रुपये गेले होते. पण, हे पैसे १० वर्षानंतर परत करण्यात आले. हे पैसे कर्जाच्या स्वरुपात घेतले होते, असा दावा संजय राऊतांच्या पत्नीने केला होता. पण, संजय राऊतांचा देखील या घोटाळ्यात सहभाग असल्याचा संशय ईडीला होता. त्यामुळे ईडीने संजय राऊतांच्या कुटुंबीयांवर छापेमारी केली होती. याच घोटाळ्याप्रकरणी ईडीने संजय राऊतांची मालमत्ता जप्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com