Latest Marathi News: इतके दिवस मुंबई पोलिस काय करत होते? बातमीनंतरच सुरु झालं 'ऑपरेशन एजे': Amruta Fadnavis Blackmail Case | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amruta Fadnavis Blackmail Case

Amruta Fadnavis Blackmail Case : इतके दिवस मुंबई पोलिस काय करत होते? बातमीनंतरच सुरु झालं 'ऑपरेशन एजे'

Latest Marathi News: बुकी अनिल जयसिंघानी याला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अनिल जयसिंघानी याला अटक करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वीच त्याची मुलगी अनिक्षा जयसिंघानीला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता अनिल जयसिंघानी याला अटक करण्यात आली आहे. पण या अटकेनंतर सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणाची एफआयआरची तारीख 20 फेब्रुवारी आहे. त्यानंतर १६ मार्चला यासंदर्भातील बातमी प्रसिद्ध झाली. 72 तासांच्या सलग सर्चनंतर अटक झाल्याचं पोलीस सांगत आहेत.

इतकी वर्षे फरार असलेला आरोपी 5 दिवसांतच पकडला गेला. यासर्व घडामोडीनंतर इतके दिवस मुंबई पोलिस काय करत होते? असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित होत आहे.

२० फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी डिझायनर अनिक्षा आणि तिच वडिल अनिल जयसिंघानी यांच्यावर १ कोटी रुपयांची लाच ऑफर केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी फौजदारी कट रचण्याच्या आरोपासह भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यातील कलम ८ आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मलबार हिल पोलीस ठाण्यात अमृता फडणवीस यांनी २० फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, अनिक्षा आणि त्यांची नोव्हेंबर २०२१ मध्ये पहिल्यांदा भेट झाली होती.

नेमकं काय आहे प्रकरण?

अमृता फडणवीस यांनी एका डिझायनर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. डिझायरने अमृता फडणवीसांना १ कोटींची लाच ऑफर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या तक्रारीनंतर मलबार हिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

एका गुन्ह्यात मदत करण्याची मागणी करत बुकींची माहिती देऊन तब्बल 1 कोटी तुम्हाला देऊ अशी ऑफर अमृता फडणवीस यांना आरोपी महिलेने आणि तिच्या वडिलांनी केली होती. तसेच, डीझायनर धमकावण्याचा प्रयत्न करत होती.

कोण आहे अनिक्षा?

अनिक्षा जयसिंघानी ही सट्टेबाज अनिल जयसिंघानी यांची मुलगी आहे. अनिलल जयसिंघानीवर महाराष्ट्र, गोवा आणि आसामच्या सरकारी अधिकाऱ्यांना धमक्या देणं, फसवणूक करणं असे गुन्हे नोंद आहेत. अनिक्षाने कायद्याच्या विषयात पदवी घेतली.

स्वतःला डिझायनर म्हणवणारी अनिक्षा १६ महिने अमृता फडणवीस यांच्या संपर्कात आहे. अनिक्षा जयसिंघानी ही पेशाने फॅशन डिझायनर आहे. ती कपडे, ज्वेलरी, शूज हे डिझाईन करते.

२०२१ मध्ये अनिक्षाने अमृता फडणवीस यांना ती भेटली होती. तिने फॅशन विश्वातल्या विविध गोष्टी सांगितल्या आणि अमृता फडणवीस यांचा विश्वास संपादन केला.

कोण आहे जयसिंघानी?

अनिल जयसिंघानी विरोधात १४ ते १५ गुन्हे दाखल असून तो गेल्या ७ ते ८ वर्षांपासून फरार होता. अखेर, तो गुन्हे शाखेच्या जाळ्यात अडकला आहे. जयसिंघानी हा सट्टेबाजीच्या अनेक प्रकरणांमध्ये गुंतला होता. तो एकप्रकारे टोळी चालवत असल्याचीही माहिती समोर येत आहे.

तो त्याच्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्धची माहितीही पोलिसांना देत त्यांच्यावर कारवाई करण्यास भाग पाडत असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळते आहे. जयसिंघानी याची मुलगी अनीक्षा २०१५ -१६ मध्येही अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती. त्यानंतर, तिच्याशी पूर्णत: संपर्क तुटला. अनिक्षा ही कायद्याचे शिक्षण घेतले आहे. ती उच्च शिक्षित आहे.

२०१५ मध्ये जयसिंघानी ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या उल्हासनगर येथील घरात छापा कारवाई केली होती. यावेळी मोठे नेटवर्क ईडीच्या हाती लागले. याप्रकरणात तब्येतीचे कारण पुढे त्याने उच्च न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला होता.

मुंबईतील साकीनाका आणि आझाद मैदान पोलीस ठाण्यात २०१६ मध्ये त्याच्याविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले होते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीत, अहमदाबाद कोर्टानेही त्याच्याविरुद्ध नॉन बेलेबल वारंट जारी केले होते.

यावेळी देखील त्याने आजारी पाडण्याचे नाटक केले होते. त्यानंतर, बायकोच्या शस्त्रक्रियेसंबंधित बनावट कागदपत्रेही सादर केले होते. ईडी अधिलकार्यांसह मुंबई, ठाणे, गोवा, आसाम, गुजरात आणि मध्यप्रदेश पोलीस त्याचा शोध घेत होते.