मुंबईतील पावसाने रेल्वे वाहतूक ठप्प 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

मुंबईतील मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे बहूतेक मेल एक्‍सप्रेस व पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या तात्पुरत्या रद्द केल्या असून काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. दरम्यान, या पावसामुळे प्रवासाला निघालेले हजारो प्रवासी रेल्वे स्थानकांवर अडकले आहेत.

प्रवासी अडकले स्थानकांवर : रुळावर पाणी साचल्याने मेल एक्‍सप्रेस रद्द 
सोलापूर - मुंबईतील मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. त्यामुळे बहूतेक मेल एक्‍सप्रेस व पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या तात्पुरत्या रद्द केल्या असून काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. दरम्यान, या पावसामुळे प्रवासाला निघालेले हजारो प्रवासी रेल्वे स्थानकांवर अडकले आहेत. 

रद्द केलेल्या गाड्या... 
- मुंबई- पंढरपूर फास्ट पॅसेंजर 
- मुंबई- सोलापूर सिद्धेश्‍वर 
- मुंबई- चेन्नई एक्‍सप्रेस 
- मुंबई- साईनगर फास्ट पॅसेंजर 
- साईनगर- मुंबई फास्ट पॅसेंजर 
- हैदराबाद- मुंबई एक्‍सप्रेस 
- हैदराबाद- मुंबई हुसेन सागर एक्‍सप्रेस 
- सोलापूर- मुंबई सिद्धेश्‍वर एक्‍सप्रेस 
- मुंबई- विजापूर फास्ट पॅसेंजर 

अंशिक रद्द रेल्वे गाड्या.... 
- विशाखापट्टणम लोकमान्य टिळक टर्मिनस एक्‍सप्रेस ही पुण्यापर्यंतच 
- विजापूर- मुंबई फास्ट पॅसेंजर ही पुण्यापर्यंत धावेल 
- चेन्नई- मुंबई एक्‍सप्रेस ही पुण्यापर्यंत धावेल. ही गाडी पुण्यातून मुंबई- मद्रास एक्‍सप्रेस धावणार 
- नांदेड- पनवेल एक्‍सप्रेस ही पुण्यात स्थानकापर्यंत धावेल. तेथून ती पनवेल- नांदेड एक्‍सप्रेस म्हणून धावणार आहे. 
- पुणे शहर- मुंबई कोणार्क एक्‍सप्रेस ही पुण्यात स्थानकापर्यंत धावेल 
- हुबळी लोकमान्य टिळक एक्‍सप्रेस दौंड स्थानकापर्यंत धावणार आहे. 
- हैदराबाद- मुंबई एक्‍सप्रेस दौंड स्थानक धावणार असून ही गाडी कुर्डूवाडी स्थानकावरून मुंबई- हैदराबाद हुसेन सागर एक्‍सप्रेस म्हणून धावणार आहे. 
- चेन्नई- मुंबई एक्‍सप्रेस पुणे स्थानकापर्यंत धावणार असून तेथून ती मुंबई- चेन्नई एक्‍सप्रेस म्हणून सुटणार आहे. 
- बेंगलोर- मुंबई उद्यान एक्‍सप्रेस सोलापूर स्थानकापर्यंत धावणार आहे. 
- कोईमतूर- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्‍सप्रेस पुण्यापर्यंत धावणार असून तेथून ती लोकमान्य टिळक टर्मिनस कोईमतूर एक्‍सप्रेस म्हणून सुटेल. 
- मुंबई- भुवनेश्वर कोणार्क एक्‍सप्रेस पुणे स्थानकापर्यंत धावणार आहे. 
- त्रिवेंद्रम- मुंबई एक्‍सप्रेस दौंड स्थानकापर्यंत धावणार असून तेथून ती मुंबई- नागरकोईल एक्‍स्प्रेस म्हणून धावणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai Rain Railway Transport Stop