Mumbai Rain Updates: दक्षिण आणि मध्य मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Rain Updates

Mumbai Rain Updates: दक्षिण आणि मध्य मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात

मुंबईः राज्यामधून पाऊस काढता पाय घ्यायचं नाव घेत नाहीये. मराठवाड्यात कालच्या पावसाने मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान केल्यानंतर मुंबईत आज पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे.

मुंबईतदेखील मागील तीन-चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढलेला आहे. आज गुरुवारी मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झालीय. दादर, वरळी, सायन, घाटकोपर, चेंबुर या भागात दुपारी दोन वाजल्यापासून मुसळधार पाऊस सुरु आहे.

दरम्यान, मराठवाडा आणि विदर्भामध्ये हंगाम संपला तरी पाऊस थांबत नाहीये. काल आणि परवा या दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे कापूस, सोयाबीनचं नुकसान झालेलं आहे. सध्या सोयाबीन काढणीचे दिवस आहेत. काढलेले सोयाबीन भिजल्याने दर्जाहीन होत आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.