मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे तुडुंब

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 सप्टेंबर 2016

अप्पर वैतरणा आणि भातसा ओसंडून वाहणार
मुंबई - मुंबईला पाणीपुरवठा करणारे सातही तलाव पुन्हा तुडुंब भरले आहेत. त्यांच्यामध्ये 99 टक्के पाणीसाठा झाला असून, पावसाचा जोर असाच राहिल्यास उद्या (ता. 21) सकाळपर्यंत त्यांच्यामध्ये 100 टक्के पाणीसाठा होईल. अप्पर वैतरणा आणि भातसा धरण तर कोणत्याही क्षणी ओसंडून वाहू शकतील. वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी फक्त 11 हजार दशलक्ष लिटर पाण्याची आवश्‍यकता आहे.

पावसाने काही दिवसांपासून चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाण्याच्या पातळीतही प्रचंड वाढ होऊ लागली आहे. मुंबईला वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी 14 लाख 47 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठ्याची आवश्‍यकता असते. सध्या 14 लाख 36 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा झाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे इतर तलाव यापूर्वीच ओसंडून वाहू लागले आहेत, तर भातसा आणि अप्पर वैतरणा ही दोन्ही धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. भातसा धरणाची क्षमता सात लाख 17 हजार 37 दशलक्ष लिटर आहे, तर सध्या सात लाख आठ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा आहे. अप्पर वैतरणा धरणाची क्षमता दोन लाख 27 हजार दशलक्ष लिटर असून, सध्या दोन लाख 26 हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा आहे.

तलावातील पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)
तलाव - क्षमता - सध्याचा पाणीसाठा

मोडकसागर- 128925 - 128925
तानसा- 145080 - 144122
विहार- 27698 - 27698
तुलसी- 8046 - 8046
अप्पर वैतरणा- 227047 - 226083
भातसा- 717037 - 708532
मध्य वैतरणा- 193530 - 192629 

Web Title: Mumbai water supply Dam full of water

टॅग्स