भाजपचे लक्ष 'शत प्रतिशत'कडे

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 12 जानेवारी 2017

शिवसेनेची कसोटी; दोन्ही कॉंग्रेसमोर ताकद कायम राखण्याचे आव्हान
मुंबई - राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावतीसह दहा महापालिका, 25 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीची आचारसंहिता बुधवारी जाहीर झाली. नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांचा फड मारल्यावर या निवडणुकांमध्येही "शत प्रतिशत' भाजप करण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष केंद्रित केले आहे.

शिवसेनेची कसोटी; दोन्ही कॉंग्रेसमोर ताकद कायम राखण्याचे आव्हान
मुंबई - राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावतीसह दहा महापालिका, 25 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीची आचारसंहिता बुधवारी जाहीर झाली. नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांचा फड मारल्यावर या निवडणुकांमध्येही "शत प्रतिशत' भाजप करण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष केंद्रित केले आहे.

राज्यातील नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकीमध्ये भाजपने पहिला क्रमांक पटकावला असून, सर्वांत जास्त नुकसान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे झाले. गेल्या निवडणुकीपेक्षा शिवसेनेच्या जागा वाढल्या असल्या, तरी पक्षाला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. कॉंग्रेसचे नुकसान झाले असले, तरी "राष्ट्रवादी'च्या तुलनेत कॉंग्रेसने या निवडणुकीत चांगली कामगिरी केली.

नगरपालिकांनंतर राज्यातील जिल्हा परिषदा आणि दहा मोठ्या महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मुंबई आणि ठाणे महापालिकेचा समावेश आहे. या निवडणुका जिंकण्यासाठी भाजपनेही कंबर कसली असून, दोन्ही कॉंग्रेस आघाडी करण्याच्या तयारीत आहेत. गेल्या वेळचे संख्याबळ राखण्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसमोर आव्हान आहे.

नगर परिषद/नगर पंचातीच्या निवडणुकीतील पक्षीय बलाबल
(कंसातील आकडे गेल्या निवडणुकीतील)

भाजप - 1090 (398), कॉंग्रेस - 894 (1068), राष्ट्रवादी कॉंग्रेस - 786
(1152), शिवसेना - 598 (359)
नगराध्यक्ष - भाजप - 64, कॉंग्रेस - 33, राष्ट्रवादी कॉंग्रेस - 21, शिवसेना - 26

दहा महापालिकांतील सध्याचे बलाबल
1. मुंबई - भाजप - 31, राष्ट्रवादी कॉंग्रेस - 13, कॉंग्रेस - 52, शिवसेना - 75, मनसे - 28

2. ठाणे - भाजप 8, राष्ट्रवादी कॉंग्रेस 34, कॉंग्रेस 18, शिवसेना 53, मनसे 7

3. उल्हासनगर - भाजप 11, राष्ट्रवादी कॉंग्रेस 20, कॉंग्रेस 8, शिवसेना 19, मनसे 1

4. पुणे - भाजप 26, राष्ट्रवादी कॉंग्रेस 51, कॉंग्रेस 28, शिवसेना 15, मनसे 29

5. पिंपरी-चिंचवड - भाजप 3, राष्ट्रवादी कॉंग्रेस 83, कॉंग्रेस 14, शिवसेना 14, मनसे 4

6. सोलापूर - भाजप 25, राष्ट्रवादी कॉंग्रेस 16, कॉंग्रेस 45, शिवसेना 8, मनसे 00

7. नाशिक - भाजप 14, राष्ट्रवादी 20, कॉंग्रेस 15, शिवसेना 19, मनसे 40

8. नागपूर - भाजप 62, राष्ट्रवादी 6, कॉंग्रेस 41, शिवसेना 6, मनसे 2

9. अमरावती - भाजप 7, राष्ट्रवादी 17, कॉंग्रेस 25, शिवसेना 10, मनसे 00

10. अकोला - भाजप 18, राष्ट्रवादी 5, कॉंग्रेस 18, शिवसेना 8, मनसे 1
 

जिल्हा परिषद पक्षीय बलाबल
1. रत्नागिरी - भाजप 7, राष्ट्रवादी 19, कॉंग्रेस 3, शिवसेना 25

2. सिंधुदुर्ग - भाजप 3, राष्ट्रवादी 10, कॉंग्रेस 33, शिवसेना 4

3. नाशिक - भाजप 4, राष्ट्रवादी 27, कॉंग्रेस 14, शिवसेना 17, मनसे 3

4. रायगड - भाजप 1, राष्ट्रवादी 20, कॉंग्रेस 7, शिवसेना 14

5. जळगाव - भाजप 23, राष्ट्रवादी 20, कॉंग्रेस 10, शिवसेना 15

6. अहमदनगर - भाजप 6, राष्ट्रवादी 32, कॉंग्रेस 28, शिवसेना 6

7. पुणे - भाजप 3, राष्ट्रवादी 42, कॉंग्रेस 11, शिवसेना 12, मनसे 1

8. सातारा - भाजप 0, राष्ट्रवादी 39, कॉंग्रेस 21, शिवसेना 0, मनसे 0

9. सांगली - भाजप 0, राष्ट्रवादी 33, कॉंग्रेस 23, शिवसेना 0, मनसे 0

10. सोलापूर - भाजप 0, राष्ट्रवादी 33, कॉंग्रेस 18, शिवसेना 0, मनसे 0

11. कोल्हापूर - भाजप 1, राष्ट्रवादी 16, कॉंग्रेस 31, शिवसेना 6, मनसे 0

12. औरंगाबाद - भाजप 6, राष्ट्रवादी 10, कॉंग्रेस 16, शिवसेना 17, मनसे 8

13. जालना - भाजप 15, राष्ट्रवादी 16, कॉंग्रेस 3, शिवसेना 15, मनसे 1

14. परभणी - भाजप 2, राष्ट्रवादी 25, कॉंग्रेस 8, शिवसेना 11, मनसे 0

15. हिंगोली - भाजप 0, राष्ट्रवादी 10, कॉंग्रेस 9, शिवसेना 27, मनसे 0

16. बीड - भाजप 20, राष्ट्रवादी 30, कॉंग्रेस 0, शिवसेना 2, मनसे 0

17. नांदेड - भाजप 4, राष्ट्रवादी 18, कॉंग्रेस 25, शिवसेना 9, मनसे 0

18. उस्मानाबाद - भाजप 2, राष्ट्रवादी 19, कॉंग्रेस 20, शिवसेना 13, मनसे 0

19. लातूर - भाजप 8, राष्ट्रवादी 9, कॉंग्रेस 35, शिवसेना 5, मनसे 1

20. अमरावती - भाजप 9, राष्ट्रवादी 25, कॉंग्रेस 7, शिवसेना 7, मनसे 0

21. बुलडाणा - भाजप 4, राष्ट्रवादी 13, कॉंग्रेस 22, शिवसेना 11, मनसे 1

22. यवतमाळ - भाजप 4, राष्ट्रवादी 21, कॉंग्रेस 23, शिवसेना 12, मनसे 1

23. वर्धा - भाजप 17, राष्ट्रवादी 8, कॉंग्रेस 17, शिवसेना 1, मनसे 0

24. चंद्रपूर - भाजप 18, राष्ट्रवादी 7, कॉंग्रेस 21, शिवसेना 2, मनसे 1

25. गडचिरोली - भाजप 8, राष्ट्रवादी 9, कॉंग्रेस 14, शिवसेना 2, मनसे 0

सध्याचे 33 जिल्हा परिषदांतील पक्षीय जागांची संख्या
भाजप - 281, राष्ट्रवादी - 604, कॉंग्रेस - 540, शिवसेना - 272, मनसे - 23

Web Title: municipal election bjp planning