नगरपालिका कर्मचाऱ्यांचा संप आश्वासनानंतर मागे 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 जानेवारी 2019

मुंबई - नगरपालिका व नगरपंचायत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळावा यासाठी सरकार कटिबद्ध असून, त्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत, अशी ग्वाही सरकारच्या वतीने नगरविकास प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी दिल्याने कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. 

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच नगर परिषद व नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू व्हावा, या मागणीसह इतर मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला होता. त्यावर तोडगा काढण्यासाठी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी बैठक घेतली. 

11 मार्च 1999 ते 27 मार्च 2000 या कालावधीतील रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्याचा निर्णय येत्या 31 जानेवारीपर्यंत घेण्यात येईल, ही मागणीही या वेळी मंजूर करण्यात आल्याने संप मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. 

Web Title: Municipal workers on strike back after promise