दमदार पावसासाठी मुस्लिम बांधव करताहेत नमाज पठण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जुलै 2019

गेल्या वर्षी दुष्काळाशी दोन हात केल्यावर सर्वांच्या नजरा आभाळाकडे होत्या. मात्र, जुलै निम्मा होऊन गेला तरी समाधानकारक सर्वदूर पाऊस झालेला नाही. पेरण्या लांबल्या आहेत.

नांदेड : जुलै संपत आला तरी दमदार पावसाचा पत्ता नसल्याने जिल्हाभरात दुष्काळी स्थिती कायम आहे. सर्वदूर चांगला पाऊस पडावा, सर्व चराचरावर कृपा करावी, यासाठी मुस्लिम बांधवांनी शनिवारी (ता.20) खुदबाईनगर ईदगाह मैदानावर विशेष प्रार्थनेसह नमाज अदा केली. 

गेल्या वर्षी दुष्काळाशी दोन हात केल्यावर सर्वांच्या नजरा आभाळाकडे होत्या. मात्र, जुलै निम्मा होऊन गेला तरी समाधानकारक सर्वदूर पाऊस झालेला नाही. पेरण्या लांबल्या आहेत. अल्प पावसावर झालेल्या पेरण्या संकटात आहेत. चारा-पाणी टंचाई कायम आहे. ग्रामीण भाग पाणीटंचाईने होरपळून निघाला आहे. या पार्श्‍वभूमीवर ईदगाह मैदानावर काल सकाळी हजारोंच्या संख्येत मुस्लिम नागरिकांनी 'सर्वत्र दमदार पाऊस पडावा' अशी प्रार्थना करत नमाज अदा केली. या वेळी भुरभूर पाऊस सुरू होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Muslims are prayer for Heavy Rain