सरकारला अंतिम इशारा देण्यासाठी जळगावला शेतकरी परिषदः अनिल देठे

सनी सोनावळे
गुरुवार, 31 ऑगस्ट 2017

टाकळी ढोकेश्वर (नगर): शेतक-यांची संपूर्ण कर्जमुक्ती बरोबरच इतर मागण्यांसाठी सरकारला अंतिम इशारा देण्यासाठी जळगाव येथे २६ सप्टेंबर रोजी शेतकरी परीषद घेण्यात येणार असल्याची माहीती सुकाणु समितीचे सदस्य व भुमिपुत्र संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल देठे यांनी दिली.

टाकळी ढोकेश्वर (नगर): शेतक-यांची संपूर्ण कर्जमुक्ती बरोबरच इतर मागण्यांसाठी सरकारला अंतिम इशारा देण्यासाठी जळगाव येथे २६ सप्टेंबर रोजी शेतकरी परीषद घेण्यात येणार असल्याची माहीती सुकाणु समितीचे सदस्य व भुमिपुत्र संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल देठे यांनी दिली.

देठे म्हणाले, सुकाणू समितीच्या परभणी येथे संपन्न झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑनलाईनचा घोळ घालीत व अटी शर्ती लादीत लाखों शेतक-यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवले जात आहे. शेतमालाला रास्त भाव व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींबाबत कोणतीही ठोस कारवाई करण्यास सरकार तयार नाही. उलट दडपशाही करून आंदोलन कमजोर करण्याचे विफळ प्रयत्न सरकार करत आहे. अशा पार्श्वभूमीवर सरकारला अंतिम इशारा देण्यासाठी जळगाव येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातून मोठ्या संख्येत शेतकरी या परिषदेत सामील होतील व सरकारला मागण्या मान्य करायला भाग पाडतील असा विश्वास सुकाणू समितीने व्यक्त केला आहे.

शेतकरी संप आणि १४ व १५ ऑगस्ट रोजीच्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यभर शेतकरी कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल केल्या आहेत. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांना अटक करून जेलमध्ये ठेवण्याचे प्रकारही झाले आहेत. परभणी येथील कार्यकर्त्यांना विशेष लक्ष्य करण्यात आले आहे. अशा पार्श्वभूमीवर लढणा-या कार्यकर्त्यांच्या मागे ठामपणे उभे राहण्यासाठी व कोणत्याही दडपशाहीला न जुमानता शेतकरी आंदोलन पुढे घेऊन जाण्यासाठी सुकाणू समितीची बैठक जाणीवपूर्वक परभणी येथे घेण्यात आली.

सुकाणू समितीमध्ये सामील असणा-या सर्व संघटनांचे प्रतिनिधी बैठकीसाठी उपस्थित होते. सुकाणू समितीत नव्याने सामील होऊ इच्छिणा-या काही नव्या संघटनांचे प्रतिनिधीही बैठकीसाठी हजर होते.

शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील, आ. बच्चू कडू, बाबा आढाव, डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संतोष वाडेकर, राज्य प्रवक्ते अनिल देठे पाटील, संजय पाटील घाटणेकर व सुशीला मोराळे उपस्थित होते.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
येथे 'बाबा'चे समर्थक रस्त्यावर; इतर देशांत बलात्काऱ्यांचे काय होते पाहा

'स्वाभिमानी शेतकरी' सरकारमधून बाहेर; 'शेतकऱ्यासाठी पुन्हा रस्त्यावरची लढाई'
आणखी एक चांगला अधिकारी विदर्भात पळविला 
मुंबई: भेंडीबाजारमध्ये इमारत कोसळली; चौघांचा मृत्यू
पाचशे, हजाराच्या 99 टक्के नोटा बँकांमध्ये जमा 
मुंबईतील पावसात बेपत्ता झालेल्या डॉ. अमरापूरकरांचा सापडला मृतदेह
नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यात पावसाळ्यातही किलबिलाट
कोयना धरणातील पाणीसाठा शंभर टीएमसीकडे
मानव विकास निर्देशांकामध्ये राज्यातील १२५ तालुके पिछाडीवर
ठाणेदारांनी केला महिला पीएसआयविरोधात गुन्हा दाखल
सुरवंटाचे फुलपाखरात रूपांतराची अनुभूती

Web Title: nagar news farmers founcil to give final warning to the government says anil dethe