कोपर्डीचा तपास करणाऱ्या पथकाचे मुख्यमंत्र्याकडून खास अभिनंदन !

devendra fadnavis
devendra fadnavis

पाटोळे, डॉ. गोर्डे, घोडेचोर, वाबळे यांचे पत्र पाठवून कौतुक

नगर: "कोपर्डी (ता. कर्जत) येथील अत्याचार व खून खटल्यातील आरोपीला कठोर शिक्षा झाली. न्यायालयात गुन्हा सिद्ध होऊन कठोर शिक्षा होण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या तपासाची महत्वपुर्ण भूमिका बजावल्याबद्दल अभिनंदन.'' अशा शब्दात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पत्र पाठवून कोपर्डी प्रकरणाच्या तपासात काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शबासकीची थाप दिली आहे आणि यापुढेही चांगल्या कामाची अपेक्षा व्यक्त केली.

माणुसकीला काळीमा फासणाऱ्या कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन खून केलेल्या प्रकरणातील तीनही आरोपीला फाशीची शिक्षा झाली आहे. या प्रकरणाचा नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने केलेला तपास महत्वपुर्ण ठरला आहे. तपासी अधिकारी व तत्कालीन पोलिस निरिक्षक शशिराज पाटोळे, सहाय्यक तपासी अधिकारी व सध्या स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलिस निरिक्षक डॉ. शरद गोर्डे, पोलिस हेड कॉन्स्टेबल विष्णु घोडेचोर व सुरज वाबळे यांनी तपासात महत्वाची भूमिका बजावली होती. कोपर्डी घटनेनंतर राज्यभर संताप व्यक्त झाला. आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी मराठा कांती मोर्चा निघाले. त्यामुळे तपासात कसलीही त्रुटी राहणार नाही, याबाबत पोलिस अधिकाऱ्यांनी काळजी घेतली. तिनही आरोपीला न्यायालयाने अपेक्षेप्रमाणे फाशीची शिक्षा झाली. त्यासाठी पोलिसांचा तपास महत्वाचा ठरला. त्यामुळे तपासात महत्वाची भूमिका बजावणारे तपासी अधिकारी शशिराज पाटोळे, सहाय्यक तपासी अधिकारी डॉ. शरद गोर्डे, पोलिस हेड कॉन्स्टेबल विष्णु घोडेचोर व सुरज वाबळे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी खास पत्र पाठवून अभिनंदन केले आहे.

"माणुसकीला काळीमा फासणाऱ्या कोपर्डी (ता. कर्जत) येथील अत्याचार व खून खटल्यातील आरोपीला कठोर शिक्षा झाली. न्यायालयात गुन्हा सिद्ध होऊन कठोर शिक्षा होण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या तपासाची महत्वपुर्ण भूमिका होती, अभिनंदन.'' या शब्दात गौरव करताना "यापुढे आपल्याकडून असेच काम होईल.  आणि महाराष्ट्र पोलिस दलाचे नाव उंचावेल'' अशी अपेक्षा व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com