तीन नगरपंचायतीत भाजपला दणका 

तीन नगरपंचायतीत भाजपला दणका 

62 नगरसेवकांपैकी 8 जागांवर विजय; शिवसेनेचे सर्वाधिक 28 नगरसेवक 
मुंबई - राज्यातील तीन नगरपंचायतीच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला दणका बसला असून, एकाही नगरपंचायतीवर भाजपचा नगराध्यक्ष निवडून आलेला नाही. या तीन नगरपंचायतीपैकी पालघरमध्ये शिवसेना सर्वांत मोठा पक्ष असला, तरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचा विजयी झाला आहे. तर, सिंदखेडराजा नगरपंचायतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्या असताना, नगराध्यक्षपदाच्या निवडीत शिवसेनेचा विजय झाला. लोणार नगरपंचायत मात्र कॉंग्रेसने एकहाती निर्विवाद वर्चस्वाने जिंकली आहे. या तिन्ही नगरपंचायतीत 62 नगरसेवक आहेत. यापैकी सर्वाधिक 28 जागांवर शिवसेनेने बाजी मारली आहे. तर, भाजपला केवळ 8 जागा मिळाल्या. कॉंग्रेसला 10, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही 10 जागांवर यश मिळाले. 

पक्षनिहाय बलाबल 
पालघर - नगराध्यक्ष (राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष ) 
एकूण जागा (28) : शिवसेना (14), भाजप (7), राष्ट्रवादी (2), कॉंग्रेस (5) 

सिंदखेडराजा : नगराध्यक्ष (शिवसेना ) 
एकूण जागा (17) : राष्ट्रवादी (8), शिवसेना (7), भाजप (1) 

लोणार : नगराध्यक्ष (कॉंग्रेस) 
एकूण जागा (17): कॉंग्रेस (10), शिवसेना (7)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com