Nagpur: नागपूरमध्ये भीषण अपघात; 80 फूट फ्लायओव्हरवरून पडल्याने चौघांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur Accident News

Nagpur : नागपूरमध्ये भीषण अपघात; 80 फूट फ्लायओव्हरवरून पडल्याने चौघांचा मृत्यू

Nagpur Accident News नागपूर : सक्करदरा परिसरात भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत दुचाकीवरून जाणारे चौघे जण सुमारे 70 ते 80 फूट उंच फ्लायओवरवरून खाली फेकले गेले त्यात चौघांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये 2 चिमुरड्यांचाही समावेश आहे.

सक्करदरा परिसरात रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास फ्लायओवरवर गर्दीतून जाताना अनियंत्रित चारचाकी कारने दोन दुचाकींना जोरात धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील चौघे जण फ्लायओवरच्या खाली फेकले गेले. दुचाकीवरील चौघेही सुमारे 70 ते 80 फूट उंचीवरून खाली असणाऱ्या रस्त्यावर फेकले गेल्याने चौघेजण गंभीर जखमी झाले आहे. या चौघांणा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

धडक देणाऱ्या चार चाकी वाहनाच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून तो कारच्या मालकाचा ड्रायव्हर असल्याची माहिती समोर आली आहे. गंभीर जखमी असलेल्या चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतामध्ये एक पुरुष, एक स्त्री आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. तर चारचाकीने धडक दिलेल्या दुसऱ्या दुचाकी वर बसलेले चौघेही गंभीर जखमी झाले आहे.

Web Title: Nagpur Accident Four People Fall From A Height Of 70 To 80 Feet From Flyover

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..