नागपूर, गोंदिया जिल्ह्यांत नगराध्यक्षही कोट्यधीश 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 3 जानेवारी 2017

मुंबई - राज्यातील नगरपालिकांच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक लढविलेले उमेदवार आर्थिकदृष्ट्या श्रीमंत असल्याचे दिसून आले असतानाच शेवटच्या टप्प्यात झालेल्या नागपूर व गोंदिया जिल्ह्यांतील नगराध्यक्षही कोट्यधीश असल्याचे एका सर्वेक्षणातून दिसून आले आहे. 

नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यांतील नगराध्यक्षपदांची निवडणूक आठ जानेवारी रोजी पार पडली. दोन्ही जिल्ह्यांतील 23 नगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 77 उमेदवारांनी निवडणूक लढविली. यात नरखेड नगरपालिकेच्या नगराध्यपदासाठी निवडणूक लढविलेल्या अभिजित गुप्ता यांची सर्वाधिक; म्हणजे पाच कोटी 34 लाख 74 हजार रुपयांची मालमत्ता असल्याचे दिसून आले आहे. काटोलच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढविलेल्या कल्पना चार्डे आणि गोंदियातील गोवर्धन जैयस्वाल यांची सर्वांत कमी, म्हणजेच दोन लाखांपेक्षा कमी मालमत्ता असल्याची बाब समोर आली आहे.

Web Title: Nagpur, Gondia districts Mayor millionaire