नागपुरात 4 मुलांना HIV ची लागण, एकाचा मृत्यू; NHRC नं सरकारला बजावली नोटीस

National Human Rights Commission
National Human Rights Commissionesakal
Summary

नागपूरमध्ये 4 मुलांना रक्त संक्रमणानंतर एचआयव्हीची बाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

नागपूर जिल्ह्यात (Nagpur) 4 मुलांना रक्त संक्रमणानंतर एचआयव्हीची (HIV) बाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या चौघांपैकी एकाचा मृत्यू झाल्याचं समजतंय. आरोग्य प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती गठित केली जाणार आहे. आता या घटनेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानंही (National Human Rights Commission, NHRC) दखल घेतलीय.

NHRC नं महाराष्ट्र सरकारच्या (Maharashtra Government) मुख्य सचिवांना नोटीस बजावून सहा आठवड्यांच्या आत या प्रकरणाचा तपशीलवार अहवाल मागवलाय. या घटनेमध्ये दोषी आढळल्यास लोकसेवक/अधिकाऱ्यांवर कारवाई किंवा प्रस्तावित केलेल्या कारवाईचा समावेश अहवालात अपेक्षित आहे. तसेच मुख्य सचिवांना मरण पावलेल्या मुलाच्या निकटवर्तीयांना दिलेली कोणतीही अंतरिम भरपाई अथवा पीडित मुलांसाठी राज्यानं सुरू केलेल्या उपचारांचा अहवाल देण्यास सांगितलंय.

National Human Rights Commission
भारतीयांना मोठा दिलासा! जर्मनीनं 'भारत बायोटेक'च्या लसीला दिली मान्यता

याशिवाय, महाराष्ट्र सरकारच्या अन्न व औषध विभागाच्या सचिवांना सहा आठवड्यांच्या आत प्राथमिक तपास आणि याप्रकरणी सुरू करण्यात आलेल्या फौजदारी कारवाईबाबतचा अहवाल सादर करण्याची नोटीसही बजावण्यात आलीय. राज्याच्या आरोग्य विभागानं याआधीच उच्चस्तरीय चौकशी सुरू केलीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com