वर्षभरात ८५ बिबट्यांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

नागपूर - महाराष्ट्रात एका वर्षात ८५ बिबट्यांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा बिबट्यांच्या मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे. पाच वर्षांत राज्यात ३५० बिबट मृत्यूमुखी झाले आहेत. 

नागपूर - महाराष्ट्रात एका वर्षात ८५ बिबट्यांचा विविध कारणांमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा बिबट्यांच्या मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे. पाच वर्षांत राज्यात ३५० बिबट मृत्यूमुखी झाले आहेत. 

बिबट्या मानवी वस्तीच्या जवळपास वास्तव्य करणारा वन्यप्राणी आहे. यामुळे पाळीव प्राण्यांना धोका निर्माण होऊ शकतो. या भीतीने अनेक ठिकाणी विषप्रयोग करण्यात आल्यानेही बिबट्यांना जीव गमवावा लागला. बिबट्यांची संख्या वाढू लागल्याने त्यांचे मानवी वस्तीकडे येण्याचे प्रमाण वाढले. यामुळे अनेक ठिकाणी बिबट आणि गावकऱ्यांमध्ये संघर्ष होतो.च वर्षांत राज्यात ३५० बिबट मृत्यूमुखी झाले आहेत. 

त्यातूनही माणसे जखमी होत असताना जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०१७ या कालावधीत ८५ बिबट मरण पावले. बिबट्यांचे मृत्यू हे विजेचा शॉक, महामार्गावरील अपघात, विहिरीत पडून आणि वृद्धत्वामुळे होत असतात. 

जंगलातून रस्ते, कालवे तयार होत आहेत. यावर आता तातडीने विचार होण्याची गरज असल्याचे मत वन्यप्रेमींचे आहे. अन्यथा पुन्हा बिबट अपघातात मरण पावण्याच्या घटना वाढतील. अमरावती-नागपूर महामार्ग तसेच ब्रह्मपुरीजवळील घटना हे अलीकडचे उदाहरण आहेत. शिवाय, गावात बिबट्याचा शिरकाव पुन्हा वाढू शकतो. यामुळेच आता नियोजन करावे लागेल, असे वन्यजीव अभ्यासकांचे म्हणणे आहे. गेल्यावर्षी ५५ नैसर्गिक, २१ अपघात आणि ९ बिबट्यांची शिकार झाली होते. त्यात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक २० तर त्यापाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यात १३ बिबटे मरण पावले.  अनेक ठिकाणी बिबट आणि गावकऱ्यांमध्ये संघर्ष होतो.

बिबट्या गावाच्या आसपास राहतो; पण ते माणसांना कळत नाही. बिबट्या हा प्राणी आपल्या जागेशी खूपच निष्ठांवत असतो. तो स्वतःहून मानवावर हल्ला करीत नाही. परंतु, त्याला आपण अज्ञातस्थळी सोडले तरी तो गावाच्या आसपास येणारच. जंगलातील लहान प्राणी, गावातील बकरी आणि कुत्रे हे त्याचे आवडते खाद्य आहे. जंगलात खाद्य मिळाले नाही तर तो गावाकडे कूच करतो, असे मानद वन्यजीव रक्षक कुंदन हाते यांनी सांगितले. 

वर्ष - मृत संख्या 
२०१३     ४३ 
२०१४     ६५ 
२०१५    ६६
२०१६     ९१ 
२०१७     ८५ 
एकूण    ३५०

Web Title: nagpur maharashtra news 85 leopard death in last year