मराठा समजाला सर्वतोपरी मदत - मुख्यमंत्री

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 19 डिसेंबर 2017

नागपूर - मराठा समाजाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळला सोमवारी दिले.

नागपूर - मराठा समाजाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळला सोमवारी दिले.

नागपूर येथे "रामगीर' निवासस्थानी मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळाने फडणवीस यांची आज भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठा समाजाबाबत सरकारने केलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणी संदर्भात भाष्य केले. मुख्यमंत्री म्हणाले, 'मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी यापुढे काही सूचना केल्यास त्यावर तत्काळ सरकारकडून कार्यवाही केली जाईल. त्यामुळे आपल्या काही सूचना असल्यास त्या सरकारच्या कानावर घालाव्यात. मराठा आरक्षणाबाबत सरकारने नेमलेल्या उपसमितीच्या सदस्यांसोबत गरज वाटल्यास मराठा क्रांती मोर्चाच्या सदस्यांची बैठक बोलावली जाईल. सरकारने मराठा समाजाविषयी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी अधिक सक्षम केली जाईल, याची ग्वाही देताना आतापर्यंत शैक्षणिक सवलतीपोटी सरकारने एक हजार कोटी इतकी रक्कम वितरित केल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृहांची सोय केली जाणार आहे. अशी सोय ज्या ठिकाणी होणार नसेल, त्या ठिकाणी वसतिगृहाचे निवासी शुल्क सरकारकडून भरले जाईल, असेही या वेळी यांनी सांगितले. या शिष्टमंडळात अण्णासाहेब पाटील, अप्पासाहेब कोळेकर, रवींद्र काळे पाटील, पूजा मोरे आदी मराठा क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी सहभाग घेतला होता.

Web Title: nagpur maharashtra news all help for maratha society