धर्मा पाटील यांची सरकारी यंत्रणेने हत्या केली : मंत्री बावनकुळे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जानेवारी 2018

लेखी आश्वासनाशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही: नरेंद्र पाटील
सरकारकडून जमिनीच्या अनुदानाबाबत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत वडील धर्मा पाटील यांचा मृतदेह स्वीकारणार नसल्याचे त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी म्हटले आहे. पत्रकार परिषदा, बैठका यातून मिळणारी आश्वासने भरपूर झाली, आता लेखी आश्वासन हवे असे त्यांचे मत आहे.

नागपूर : धर्मा पाटील यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी येत्या सात दिवसांत 199 हेक्‍टर जमिनीचे फेरमूल्यांकन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. जमिनीचे फेरमूल्यांकन करताना अंदाज चुकला असेल तर पाटील यांच्या कुटुंबीयांना व्याजासह मोबदला देण्यात येईल, असे आश्‍वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले. यावेळी त्यांनी धर्मा पाटील यांची आत्महत्या नसून सरकारी यंत्रणेने केलेली हत्याच आहे, असा आरोपही केला. 

Nagpur news Chandrashekhar Bawankule statement on Dharma Patil death

औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी धुळे जिल्ह्यातील मोजे विखरण येथील जमिनी संपादित केली होती. यात धर्मा पाटील यांच्याही जमिनीचा समावेश होता. त्यांच्या दोन हेक्‍टर बागयती जमिनीसाठी चार लाख तीन हजार रुपयांचा मोबादला देण्यात आला होता. हा मोबदला अत्यंत अल्प असून शेजारच्या जमिनींना कोट्यवधी रुपये दिल्याचे धर्मा पाटलांचे म्हणने होते. यात मोठ्या प्रमाणात घोळ घालण्यात आला असून दलालांच्या जमिनींना जादा मोबदला देण्यात आल्याचे त्यांचे म्हणने होते. अत्यल्प मोबदाला दिल्याने धर्मा पाटील यांनी मंत्रालयाच्या दारात विष प्राशन केले होते. रविवारी रात्री त्यांचे निधन झाले. यामुळे चांगलीच खळबळ उडाली असून ऊर्जामंत्र्यांनी तातडीने सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता पत्रकार परिषद घेऊन उपरोक्त माहिती दिली. 

जमिनीचे चुकीचं फेरमूल्यांकन झाल्याने मोबदला कमी मिळाल्याची पाटील यांची तक्रार होती. त्याची शासनाने गंभीर दखल घेतलेली आहे. मी स्वत: या प्रकरणात लक्ष घालून चौकशी करत आहे. येत्या सात दिवसांत चौकशी पूर्ण होईल. 199 हेक्‍टर जमिनीचे फेरमूल्यांकन करण्यात येईल, असे बावनकुळे यांनी सांगितले. सानुग्रह अनुदान धर्मा पाटील यांच्या जमिनीसह अन्य जमीनधारकां देता येईल का याची चाचपणी करण्याकरिता अहवाल मागितला आहे. धर्मा पाटील यांच्या जमिनीचे फेरमूल्यांकन 2009 ते 2015 या काळात झाले असून त्याच काळात पाटील यांच्यावर अन्याय झाल्याचे सांगून याच कॉंग्रेसला जबाबदार धरले.

लेखी आश्वासनाशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही: नरेंद्र पाटील
सरकारकडून जमिनीच्या अनुदानाबाबत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत वडील धर्मा पाटील यांचा मृतदेह स्वीकारणार नसल्याचे त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी म्हटले आहे. पत्रकार परिषदा, बैठका यातून मिळणारी आश्वासने भरपूर झाली, आता लेखी आश्वासन हवे असे त्यांचे मत आहे.

Web Title: Nagpur news Chandrashekhar Bawankule statement on Dharma Patil death