आर्थिक गुन्हे विभागामार्फत होणार "डीएसकें'चा तपास 

आर्थिक गुन्हे विभागामार्फत होणार "डीएसकें'चा तपास 

नागपूर - ""डीएसके उद्योग समूहाकडून झालेल्या आर्थिक गुन्ह्याचे स्वरूप व व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे हे प्रकरण पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके उद्योग समूहाविरोधात आर्थिक गुन्हे शाखा पुणे येथे 2851 आणि मुंबई येथे 353 गुंतवणूकदारांच्या तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत,'' असे लेखी उत्तर हिवाळी अधिवेशनात विचारलेल्या तारांकित प्रश्‍नाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. 

खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्यासह विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार अमर काळे, अस्लम शेख, डॉ. सुजित मिणचेकर, विजय वडेट्टीवार, अमिन पटेल, नसीम खान यांनी हा तारांकित प्रश्‍न विचारला होता. तक्रारदारांमध्ये बहुसंख्य ज्येष्ठ नागरिक असून, त्यापैकी काही निराधार आहेत. त्यामुळे या उद्योग समूहाविरोधात शासनाने काय कार्यवाही केली, अशी विचारणा त्यांनी प्रश्‍नाद्वारे केली होती. या प्रकरणी गुंतवणूकदारांच्या तक्रारीनुसार ठेवीदारांच्या हितसंबंधांचे रक्षण कायदा, 1999 अन्वये शिवाजीनगर पोलिस स्टेशन येथे डीएसके यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com