वृत्तपत्र विक्रेत्यांना मिळणार हक्काची जागा - डॉ. रणजित पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

नागपूर - शहरांमधील वृत्तपत्र विक्रेत्यांना हक्काची जागा मिळण्याचा मार्ग नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मोकळा केला आहे.

नागपूर - शहरांमधील वृत्तपत्र विक्रेत्यांना हक्काची जागा मिळण्याचा मार्ग नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी मोकळा केला आहे.

आशिष शेलार यांनी मुंबई, ठाणे महापालिका हद्दीतील वृत्तपत्र विक्रेत्यांवर महापालिकांकडून कारवाई होत असल्याने व्यवसाय करणे कठीण झाल्याकडे लक्ष वेधले होते. यावर पाटील यांनी राज्यातील सर्वच महापालिका क्षेत्रात वृत्तपत्र विक्रेत्यांना फेरीवाला धोरणाअंतर्गत जागा देण्यासंदर्भात निर्देश देण्यात येईल, असे सांगितले. यावर सुनील प्रभू निश्‍चित कालावधी सांगा, असे म्हणाले. यावर 15 दिवसांत महापालिकांना निर्देश देण्याचे आश्‍वासन पाटील यांनी दिले.

फेरीवाला धोरण निश्‍चित करण्यात येणार असून, सर्वत्र टाउन व्हेंडिंग समिती स्थापन केल्या जातील. यात फेरीवाले, सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश राहणार आहे. रेल्वे हद्दीतील वृत्तपत्र विक्रेत्यांना संरक्षण देण्याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तसेच या विक्रेत्यांच्या प्रश्‍नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी लोकप्रतिनिधी, विक्रेत्या संघटना, पालिका आयुक्त, रेल्वे व पालिका अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक 15 दिवसांत घेण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले. चर्चेत सदस्य मंगलप्रभात लोढा यांनीही भाग घेतला.

Web Title: nagpur news Newspaper sellers will get the right place