‘स्मार्ट ॲण्ड हायटेक’ असेल पोलिस बंदोबस्त

नागपूर - हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी बाहेर जिल्ह्यातून जवळपास तीन हजार पोलिस कर्मचारी उपराजधानीत दाखल झाले आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांनी जवळपास २० दिवसांचा मुक्‍काम असल्यामुळे मोठमोठ्या बॅग सोबत आणल्या.
नागपूर - हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी बाहेर जिल्ह्यातून जवळपास तीन हजार पोलिस कर्मचारी उपराजधानीत दाखल झाले आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांनी जवळपास २० दिवसांचा मुक्‍काम असल्यामुळे मोठमोठ्या बॅग सोबत आणल्या.

नागपूर - हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी उपराजधानीत तीन हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले झालेत. कडेकोट बंदोबस्तासाठी नागपूर पोलिस सज्ज आहेत. कमांडोंना बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहे. अधिवेशनाचा बंदोबस्त ‘हायटेक’ आणि ‘स्मार्ट’ असेल. पोलिस अधिकारी ‘व्हॉट्‌स ॲप’ आणि अन्य माध्यमातून एकमेकांशी जोडल्या जाणार आहेत.

हिवाळी अधिवेशनची तयारी जोरात सुरू आहे. त्यामुळे पोलिस विभागानेही चोख बंदोबस्तासाठी कंबर कसली आहे. शहर पोलिस आयुक्‍त डॉ. के. वेंकटेशम्‌ यांनी बंदोबस्ताची कमान स्वतः सांभाळली आहे. ते स्वतः दिवसातून एकदा प्रत्येक ठिकाणी पाहणी करण्यासाठी भेट देत आहेत.

हिवाळी अधिवेशनासाठी राज्यातील अन्य जिल्हा पोलिस दलातून कर्मचारी मागविण्यात येत असतात. यावेळीही मुंबई (शहर आणि ग्रामीण), ठाणे, पुणे (शहर आणि ग्रामीण), औरंगाबाद, नागपूर ग्रामीण, अकोला, सीआयडी, नांदेड, नाशिक, यवतमाळ, वाशीम येथून पोलिस अधिकारी व पोलिस कर्मचारी नागपुरात दाखल झाले आहेत. यासोबत नागपूर पोलिस दलातील कर्मचारी आणि नागपूर पोलिस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी पोलिस शिपायांचीही सेवा घेण्यात येणार आहे.

यावर्षी दोन अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त, १५ पोलिस उपायुक्‍त-पोलिस अधीक्षक, ३० सहायक पोलिस आयुक्‍त, ८० पोलिस निरीक्षक, ३७० पोलिस उपनिरीक्षक, २,३०० पोलिस कर्मचारी, राज्य राखीव पोलिस दलाच्या १० प्लाटून, आठ कंपन्यांतील जवान आणि १,२०० होमगार्ड यांचा समावेश असल्याची माहिती आहे. यासोबतच नागपुरातील पोलिस उपायुक्‍त शहरातील कायदा व सुरक्षाव्यवस्था सांभाळतील. यासोबतच रामगिरी, देवगिरी, विधानभवन यासोबतच अन्य मंत्र्यांचे बंगले आणि कार्यालयाच्या सुरक्षेसाठी गुप्त पथकांची नेमणूक केली आहे.
 

व्यवस्थेची पाहणी
पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवास व्यवस्था आकार इमारत, कोराडी, बीआरओ नंदनवन, सक्‍करदरा, एमएसईबी गेस्ट हाऊस, सीआरपीएफ गेस्ट हाउस व अमरावती मार्गावरील एनबीएसएस वसतिगृहात केली आहे. विशेष शाखेच्या सहायक पोलिस आयुक्‍त रुक्मिणी गलांडे यांनी स्वतः पोलिस कर्मचाऱ्यांच्या जेवण व निवासाच्या व्यवस्थेची गुरुवारी पाहणी केली.

असे असतील मोर्चा पॉईंट
मॉरिस कॉलेज टी पॉइंट, टेकडी रोड, लिबर्टी चौक, एलआयसी चौक व कस्तुरचंद पार्कजवळील श्रीमोहिनी कॉम्प्लेक्‍स या पाच ठिकाणी मोर्चे अडविण्यात येणार आहे. पोलिस उपायुक्त दर्जाचा अधिकारी या ठिकाणी तैनात राहणार असून, आतापर्यंत ३५ मोर्चांना परवानगी दिल्याची माहिती आहे.

यंदाचे अधिवेशन शेतकऱ्यांचे
यंदाच्या हिवाळी अधिवेशनात सर्वाधिक लक्षवेधी आणि प्रश्‍न कीटकनाशकांच्या फवारणीने झालेले मृत्यू, कर्जमाफी, बोंडअळी, कापूस, धान व संत्रा या विषयांवर विचारले आहेत. अर्धा तास चर्चेतही हेच विषय प्रामुख्याने घेतले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्‍न व समस्यांवरून अधिवेशन गाजणार असल्याचे दिसून येते.

हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शेतकऱ्यांचे प्रश्‍न घेऊन १२ डिसेंबरला हल्लाबोल आंदोलन करणार आहे. यामुळे अधिवेशनाचा मुख्य विषय शेतकरी हाच राहणार आहे. सध्या आमदारांनी सादर केलेल्या लक्षवेधी, उपस्थित केलेल्या प्रश्‍नांचे विषयसुद्धा शेतकरी व शेती सर्वाधिक आहेत. यामुळे यंदा खऱ्या अर्थाने अधिवेशन विदर्भाचे ठरणार आहे.

अधिवेशन सुरू व्हायला अद्याप तीन दिवस शिल्लक आहेत. आतापर्यंत दोन्ही सभागृहांत तीन हजारांच्या जवळपास लक्षवेधी सादर केली आहेत. त्याचप्रमाणे १०० च्या जवळपास अर्धा तास चर्चा आणि ठराव मांडले आहेत. यात बहुतांश ठराव आणि चर्चेत कर्जमाफी, कीटकनाशकामुळे झालेले मृत्यू, बोंडअळीमुळे झालेले पिकांचे नुकसान, कापूस, सोयाबीनचे हमीभाव, संत्रा पिकाचे नुकसान या विषयांचा सर्वाधिक समावेश आहे. कर्जमाफीसाठी सदस्यांकडून सहकार विभागाकडून माहितीसंदर्भात अनेक सदस्यांनी अर्जही सादर केल्याची माहिती आहे. त्यामुळे शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर पहिला आठवडा गाजणार असल्याचे बोलले जात आहे.

विधानसभा 
लक्षवेधी        २,१०३
अर्धा तास चर्चा   २०९

विधान परिषद
लक्षवेधी         ८०६
अर्धा तास चर्चा    ४७
ठराव              ५२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com