Accident : नागपूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू, मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

Accident : नागपूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू, मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता

नागपूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अपघातामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८ पेक्षा अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. अशातच मृतांच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Nagpur Pune Highway Accident Death of three Sindkhed Raja )

सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का या गावानजिक ट्रकने समोरून येणाऱ्या एसटीला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे तर 8 प्रवाशी गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

अपघातात जखमी झालेल्या लोकंना तात्काळ सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णाल्यात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या अपघातात एसटी आणि ट्रक या दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

नागपूर च्या जुन्या महामार्गाजवळ हा अपघात झाला. ही बस संभाजीनगरहून वाशिमच्या दिशेने जात होती. त्याचवेळी सकाळी ६.१५ च्या दरम्यान ट्रक आणि बसची जोरदार धडक झाली. या अपघातात बसचा चालक जागीच ठार झाला आहे. आज सकाळी ६.१५ वाजता हा अपघात झाला. अपघाताच्या ठिकाणी पोलीस दाखल झाले आहेत. तसंच मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.

नागपूर महामार्गावरची वाहतूक या ठिकाणी थांबली आहे. दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. अपघात इतका भीषण होता की पाच लोक जागीच ठार झाले आहेत. जखमींमध्ये पाच जणांची प्रकृती गंभीर आहे असंही कळतं आहे. सिंदखेडराजा जवळच्या पळसखेड चमकत गावाजवळ हा अपघात झाला.