प्रत्येक युवकाला रोजगार देण्याचा संकल्प - रुडी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

नागपूर - गावागावांत आणि गावातील प्रत्येक घरापर्यंत कौशल्याचे जाळे विणले जाईल. प्रत्येक युवकाला रोजगार मिळेल. एकही मुलगा बेरोजगार राहणार नाही, हा शासनाचा संकल्प असल्याचे प्रतिपादन केंद्रीय कौशल्य विकासमंत्री राजीव प्रताप रुडी यांनी केले.

नागपुरातील करिअर मार्गदर्शन आणि कौशल्य केंद्राचे उद्‌घाटन रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. उंटखाना येथील स्पंदन ऑडिटोरीयममध्ये हा सोहळा पार पडला.

कार्यक्रमाला आमदार आशीष देशमुख, चित्रपट दिग्दर्शक व निर्माते सुभाष घई, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, फ्यूएलचे संस्थापक अध्यक्ष केतन देशपांडे, संतोष हुरालीकोप्पी, ओरीयन एज्युटेकचे संचालक मनीष अग्रवाल, एचडीएफसी बॅंकेच्या नुसरत पठाण होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या केंद्रातून १० हजार युवकांना प्रशिक्षण दिले जाणार असून, हे केंद्र जिल्ह्यासाठी वरदान असल्याचे सांगितले. कौशल्यविकास हा बेरोजगारी आणि गरिबीशी असलेला संघर्ष असून, महाराष्ट्र निश्‍चितच त्यात पुढे राहील. 

देशात युवकांची संख्या मोठी आहे. त्यांना मानव संसाधन म्हणून तयार केल्यास देशही समृद्ध होईल. त्यासाठीच हे कार्य सुरू आहे. पुढच्या काळात भारतच जगाला आवश्‍यक मानव संसाधन पुरवेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

एअर बीएनबी ॲग्रीगेटर्ससह राज्य सरकारने २२ कंपनीशी एमओयू केला असून, त्या माध्यमातून ८ लाख युवकांचे प्रशिक्षण करून त्यांना रोजगारक्षम करण्यात येईल. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कौशल्य केंद्र सुरू केले जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.  कार्यक्रमादरम्यान प्रसिद्ध दिग्दर्शक सुभाष घई यांच्या संस्थेसह विविध संस्थांशी कौशल्यविकासाबाबतचे सामंजस्य करार करण्यात आले.

महाराष्ट्रात मोठे कार्य
कौशल्य विकास ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला दिलेली देणगी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पायावर उभे करण्याचे काम केले. कौशल्यविकासाअंतर्गत सर्वांत मोठे कार्य महाराष्ट्रातच सुरू असल्याचे राजीव प्रताप रुडी म्हणाले.

Web Title: nagpur vidarbha news Resolutions for employment of every youth